नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील नरसाळा येथील विवाहित इसम गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता होता. अखेर इसमाचा मृतदेह रविवारी दुपारी 2 वाजताच्या दरम्यान तालुक्यातील सगणापूर शिवारात कुजलेल्या अवस्थेत आढळला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. रमेश सुखदेव मेश्राम (30) असे मृतकाचे नाव आहे.
रमेश मेश्राम हे 5 जानेवारीला रात्री घरून जेवण करून बाहेर गेले होते. पण ते घरी परत आलेच नाहीत. घरच्या मंडळींनी शेजारच्या लोकांना सोबत घेऊन रमेश यांचा शोध घेतला. परंतु ते गावात कुठेही सापडले नाहीत.
दुसऱ्या दिवशी बाहेरगावी असलेल्या नातेवाईकांना फोन करून विचारणा केली. तिथेही रमेश यांचा पत्ता लागला नाही. रमेश यांचा शोध लागला नसल्याने मारेगाव पोलिसात बेपत्ता असल्याची तक्रार दिली. मात्र रविवार 10 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजता दरम्यान म्हैसदोडका शिवारात नातेवाईक शोध घेण्यासाठी फिरत असताना सगणापूर शिवारात एका झाडाखाली कुजलेल्या अवस्थेत रमेश यांचा मृतदेह आढळला. मृतक रमेश यांच्या पश्चात आई, वडील पत्नी, तीन मुले असा परिवार आहे.
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा
मुख्यमंत्री होण्यापूर्वी “ते” वणी, माजरीला विकायचे किरकोळ सामान….
हेदेखील वाचा