सुशील ओझा, झरी: संपूर्ण महाराष्ट्रासह जिल्हा व तालुका पातळीवर कोविड 19 चे पहिल्या टप्प्यातील अत्यावश्यक विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचे लसीकरण संपले आहे व दुसऱ्या टप्याचे लसीकरण सुद्धा सुरू झाले आहे. परंतु अद्याप झरी तालुक्यातील एकाही शिक्षकांना कोविड 19 ची लस देण्यात आली नसल्याने शिक्षक वर्गात संताप व्यक्त होत आहे. दरम्यान कोरोनाची टेस्ट न केल्याने शिक्षकांना लस मिळाली नसल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.
तालुक्यातील महसूल पोलीस व इतर विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना पांढरकवडा येथील रुग्णालयात बोलावून पहिल्या टप्प्यातील लस देण्यात आली. मात्र शिक्षकांना अद्याप लस देण्यात आली नाही. या बाबत काही शिक्षकांनी माहिती घेतली असता पंचायत समितीतून पहिल्या टप्प्यातील शिक्षक व कर्मचारी यांच्या नावाची यादी मेल करण्यात आली नसल्याची माहिती त्यांना मिळाली.
पंचायत समितीच्या गलथान बेफिकरी व सुस्त प्रवशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे शिक्षकांना लसीकरणापासून वंचित राहावे लागत असल्याचा आरोप शिक्षकवर्ग करीत आहे. शिक्षकांचा समंध हजारो विद्यार्थ्यांशी थेट येत असल्याने कोविड 19 ची लस शिक्षकांना देणे आवश्यक होते. पहिल्या टप्प्यात शिक्षकांचे लसीकरण झाले नाही. शिक्षकांनी याबाबत आरोग्य विभागाशी संपर्क साधला असता ऑनलाईन नाव नोंदणी करण्याचे सांगितले असल्याची माहिती मिळाली आहे.
टेस्ट केल्यानंतरच लस मिळणार: डॉ. मोहन गेडाम
जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी व वयोवृद्ध यांचे पहिल्या टप्प्यातील लसीकरण झाले व दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणाची वेळ येऊन ठेपली आहे. या नंतर आता जो कोविड 19 ची तपासणी करणार नाही त्यांना लस मिळणार नसल्याचे व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे जिल्हाधिकारी यांनी आदेश दिला आहे. तालुक्यातील जनतेनी आधी कोविडची टेस्ट करावी जो निगेटिव्ह असेल त्यालाच लस मिळणार आहे
– डॉ. मोहन गेडाम, तालुका वैद्यकीय अधिकारी
हे देखील वाचा: