दहावीतील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करा
-मनसे विद्यार्थी सेनेचे शिक्षणमंत्र्यांना पत्र
जितेंद्र कोठारी, वणी : वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र राज्य बोर्डाने दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून घेण्यात आलेले परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांना परत करावेत, अशी मागणी मनसे विद्यार्थी सेनेचे शुभम पिंपळकर यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली आहे.
राज्यात कोरोना परिस्थिती बघता दहावीची परीक्षा रद्द करण्याचा बोर्डाचा निर्णय स्वागतार्ह आहे. परंतु निर्णय योग्य जरी असला तरी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पालकांपुढे मोठे आर्थिक संकट समोर उभे आहे. ग्रामीण भागातील कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर तसेच कामगार वर्गसमोर उपजीवीकेचा प्रश्न येऊन ठेपला आहे.
आपल्या पाल्यांना चांगले शिक्षण मिळावे या करिता पालकांनी जसे तसे पैसे जोडून शाळेची फी व ऑनलाईन शिक्षणकरिता स्मार्टफोन घेऊन दिले. दहावीची परीक्षा ऑफलाईन घेण्याचा शासनाचा निर्णय असल्यामुळे विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क आकारण्यात आले.
मात्र कोरोनामुळे नाईलाजास्तव दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शिक्षण विभागाला घ्यावा लागला. त्यामुळे गरीब विद्यार्थ्यांकडून वसूल करण्यात आलेली परीक्षा फी परत करण्यात यावी. जेणेकरून पालकांना काही प्रमाणात आधार मिळेल. अशी मागणी शुभम पिंपळकर यांनी निवेदनात केली आहे.
हेदेखील वाचा
साईमंदिर ते वरोरा रोड रेल्वे क्रॉसिंग पर्यंत होणार 4 लेन सिमेंट रोड
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा