नागेश रायपुरे, मारेगाव: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आज 9 मे पासून कडक निर्बंध लावण्यात आले आहे. आता विनाकारण फिरणाऱ्याची गय केली जाणार नाही. जो कोणी विनाकारण फिरताना आढळल्यास त्याची जाग्यावरच कोरोना तपासणी करून त्यांची थेट कोविड सेंटर वर रवानगी करण्याची धडक मोहीम मारेगाव प्रशासनाने आज सकाळपासून चालू केली आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस दिवस वाढत असल्याने,प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी मा.अमोल येडगे यांनी “ब्रेक द चेन” अंतर्गत जिल्ह्यात 9 ते 15 में पर्यंत कडक निर्बध लावण्याचा आदेश पारीत केला आहे. मारेगाव तालुक्यातसुध्दा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठया झपाट्याने वाढत असल्याने प्रशासन सज्ज होऊन मारेगाव प्रशासनाने कठोर पावले उचलली आहे.
संचारबंदी दरम्यान जीवनावश्यक वस्तूचे 11 नंतरही दुकाने चालू ठेवल्यास त्यांच्यावर 50 हजार रूपयांचा दंड आकारण्यात येत आहे. तसेच जो कोणी आज 9 मेंपासून विनाकारण फिरताना आढळल्यास त्याचा “फैसला ऑन दि स्पॉट” केला जात आहे. मारेगाव प्रशासनाकडून त्यांची जाग्यावरच “कोरोना तपासणी” करून त्याला थेट “कोविड सेंटर” वर पाठवण्याची धडक मोहीम येथील मार्डी चौकात राबविण्यात येत आहे.
यावेळी महसूल विभागाचे तहसीलदार दीपक पुंडे, पोलीस प्रशासनाचे ठाणेदार जगदीश मंडलवार, आरोग्य विभागाचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्चना देठे, नगर पंचायत प्रशासनाचे नोडल अधिकारी तथा अभियंता निखिल चव्हाण, गणेश निखाडे, तलाठी संतोष राठोड आदी उपस्थित होते.
नियमभंग करणाऱ्यांची गय केली जाणार नाही
तालुक्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्या व आपल्या कुटूंबाच्या सुरक्षेसाठी विनाकारण घराबाहेर निघू नये. संचारबंदीचे पालन करावे.व प्रशासनास सहकार्य करावे. जो कोणी विनाकारण फिरताना आढळल्यास त्याची गय केली जाणार नाही.
तहसीलदार- दीपक पुंडे
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा