शिवसेनेच्या रूपात माणूसकी आली धावून….

कोरोना संकटसमयी शिवसेना उतरली रुग्णसेवेत, समस्या असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन

0

जितेंद्र कोठारी, वणी: सगळेच जण कोरोनाच्या धास्तीत आहेत. एक प्रकारची अनामिक असाहयता निर्माण झाली आहे. शारीरिक आरोग्यासह मानसिक आरोग्यही जपणं तेवढंच महत्त्वाचं आहे. मदत करण्याची इच्छा असतानाही सामान्य नागरिक कोरोनाग्रस्तांना विशेष मदत करू शकत नाही. अशा विपरीत परिस्थितीमध्ये माणुसकीच्या रूपात वणी शिवसेना धावून आली.

आरोग्यविषयक इमर्जंन्सी आलीच तर कुठं जावं? कुणाला बोलवावं? काय करावं? याचं समाधानकारक उत्तर वणी शिवसेना देत आहे. शिवसेनेने रुग्णांसाठी विविध सुविधा देणे सुरू केल्यात. एका फोन कॉलवर त्यांची टीम मदतीसाठी सज्ज आहे.

कोवीड रुग्ण आणि नातेवाईकांच्या मदतीसाठी शिवसेना मैदानात उतरली आहे. वणी विधानसभा क्षेत्रातील रुग्णांसाठी ते किंवा त्यांचे नातेवाईक यांनी तत्सम वैद्यकीय मदत हवी असल्याक संपर्क साधण्याची विनंती शिवसेनेने केली आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जनतेच्या मनात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. गावागावात घरोघरी रुग्ण आढळत आहेत. सामान्य रुग्णांना न परवडणाऱ्या वैद्यकिय सेवा घेऊ शकत नाही. त्यामुळे जनता चांगलीच त्रस्त होताना दिसत आहे. ही बाब लक्षात घेऊन आता शिवसेना नागरीकांच्या स़ेवेत उतरली आहे.

शहरासह, वणी विधानसभा क्षेत्रातील नागरिकांची तसेच रुग्णांची गैरसोय होऊ नये, त्यांना सुविधा उपलब्ध व्हाव्या, यासाठी शिवसेना वणी विधानसभा संघटक सुनील कातकडे यांनी रुग्णसेवेत दोन ऑक्सिजन अँबुलन्स उपलब्ध करून दिल्यात. वणी ट्रामा केअर कोविड केंद्रात रुग्णाच्या सोयीसाठी सर्व हॉलमध्ये एक्झॉस्ट पंखे लावून दिलेत.

ऑक्सिजन सिलेंडर सेवा सुरू करण्यात आली आहे. तसेच शिवसेना शहरप्रमुख राजू तुराणकर यांच्या तर्फे शहरात निर्जंतुकीकरण फवारणी करणे सुरू आहे. युवासेना उपजिल्हाधिकारी अजिंक्य शेंडे यांच्या माध्यमातून कोविड रुग्णांसाठी घरपोच ऑक्सिजन सुविधा सुरू करण्यात आली आहे.

तसेच कोविड रुग्णांसाठी ऑक्सिजन युक्त अँबुलन्स, कोविड रुग्णांच्या घरी सॅनिटायझेन, रुग्णांच्या प्लाज्मा संदर्भात कोणत्याही माहितीसाठी किंवा मदत हवी असल्यास पुढील क्रमांकांवर संपर्क साधावा. अजिंक्य शेंडे 9096358002 युवासेना, मंगल भोंगळे 9822151729 जैन लेआऊट,

महेश पहापळे 7020454229, ललित लांजेवार 9923110411, जनार्दन थेटे 9922548109, मुन्ना बोथरा 8007850100, अंकुश पडाल 8262070367

तर कुठल्याही रुग्णाला एम्बुलेंसची गरज पडल्यास त्यांनी खालील मोबाईल क्रमांकावर अँबुलन्स ड्रायव्हर अमर आत्राम – 935613 1730, केतन सोयाम 9834553187 संपर्क करावा असे आवाहन शिवेनेच्या वतीने करण्यात आले आहे.

हेदेखील वाचा

शुल्लक कारणावरून वाद, एकमेकांवर लोखंडी सळई व विटेने हल्ला

हेदेखील वाचा

माजी आमदार पुट्टा मधू यांना आंध्रप्रदेश येथून अटक

हेदेखील वाचा

वणीमध्ये आलाये पाण्याच्या टाकीचा डॉक्टर

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.