भास्कर राऊत, मारेगाव: कत्तलीसाठी अवैधरित्या घेऊन जाणारी जनावरे मारेगाव पोलिसांनी शिताफीने पकडले. या प्रकरणी वाहनधारकासोबतच चालक तसेच सहभागी लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आला आहे. सदर घटना आज सोमवारी दि. 27 सप्टेंबरला सकाळी 7 वाजताच्या सुमारास घडली.
मारेगाव पोलिसांना एक गोपनीय माहिती मिळाली. त्यात एका वाहनामध्ये दोन जनावरे घेऊन जात असल्याची पक्की माहिती मिळाली. त्यावरून मारेगाव पोलीस बोटोनी ते घोगुलदरा या रोडने एक टाटा मॅजिक वाहन (MH 29- BC0094) विना परवानगी दोन जनावरांना घेऊन जात असताना दिसले. या वाहनाला पोलीसांनी अडवून जनावरांविषयी विचारणा केली असता त्यांनी गुळमुळीत उत्तरे दिली.
या वाहनामध्ये एक पांढऱ्या रंगाची अंदाजे 6 वर्षे वयाची गाय, किंमत 10 हजार रुपये, व लाख्या रंगाचे 3 वर्षे वयाचे कालवड, किंमत 6 हजार रुपये , टाटा मॅजिक किंमत 2 लाख रुपये, व 2 मोबाईल असे एकूण 2 लाख 24 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ज्या जनावरांचे पाय बांधून ठेवलेले होते ती जनावरे मरण यातना भोगत होते. जनावरांची खरेदी खत याविषयी विचारण्यात आले असता त्यांनी आमच्याकडे खरेदीखत नाही असे सांगितले. तसेच एजाज कुरेशी रा. उमरी रोड यांच्या सांगण्यावरून बिहाडी पोड येथून जनावरे आणली असे सांगितले. यावरून सदर जनावरे ही कत्तलीसाठी नेत असावी असा संशय बळावला.
पोलिसांनी एजाज बाबा शेख कुरेशी वय 30, पंकज मधुकर राठोड वय 31, मुकेश बळीराम पेंदोर वय 25, कैलाश अनंतराव टेकाम वय 25, प्रवीण भीमराव येरकाडे वय 27, राजीक मेहमूद कुरेशी वय 20 सर्व रा. उमरी रोड यांच्यावर कृत कलम 11 (1) (ड), प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम सहकलम 5 (ए), महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
हे देखील वाचा:
Comments are closed.