चुना भट्टी कर्मचा-याचा आढळला मृतदेह

राजूर येथील घटना, मृत्यूबाबत विविध तर्कवितर्क

जितेंद्र कोठारी, वणी: राजूर कॉलरी येथील चुनाभट्टी परिसरात एका इसमाचा मृतदेह सकाळी आढळून आला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अतुल सहदेव खोब्रागडे (40) असे मृत इसमाचे नाव असून तो राजूर कॉलरी येथील रहिवाशी होता.

Podar School 2025

सविस्तर वृत्त असे की अतुल हा राजूर येथील हाजी चुना भट्टीवर काम करायचा. रविवार रात्री तो घरी परतला नव्हता. चुना भट्टीच्या शेजारीच मजूर राहुट्या करून राहतात. एका मजुराला सकाळी 6 वाजताच्या सुमारास राहुटीजवळच अतुलचा मृतदेह आढळून आला. मजुरांनी सदर घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी वणीतील ग्रामीण रुग्णालयात पाठवला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

मृत्यूबाबत विविध तर्कवितर्क
अतुल हा मजुरांचे पगार वाटपाचेही काम करायचा. तो रविवारी दुपारी चुनाभट्टी परिसरात आढळला होता. अतुलच्या मृतदेहाच्या छातीवर मोबाईल आढळून आला तसेच त्याचे कपडे अस्तव्यस्त असल्याची माहिती आहे. त्यामुळे याबाबत विविध तर्कवितर्काला उधाण आले आहे.

हे देखील वाचा:

Comments are closed.