घरफोडे आणि दुचाकी चोरटे पुन्हा वणीत ऍक्टिव्ह

शास्त्रीनगर येथे घरफोडी तर टागोर चौकातून भर दिवसा दुचाकी लंपास.... दिवाळीच्या सुट्टी घालवल्यानंतर चोरटे पुन्हा धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज

जितेंद्र कोठारी, वणी: दिवाळीची सुट्टी घालवल्यानंतर घरफोडे आणि दुचाकी चोरटे पुन्हा शहरात ऍक्टिव्ह झाले आहेत. गुरुवारी वणीतील टागोर चौकातून चोरट्यांनी दुचारी चोरीची तर शास्त्रीनगर येथे घरफोडीची घटना घडली. आधीच जुन्या चोरीच्या प्रकरणाचा छडा लागला नसताना आता पुन्हा चोरट्यांनी शहरात धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे वणीकर पुन्हा दहशतीत आले आहेत.

वनिता कुसूमाकर बाविस्कर या वणीतील शास्त्रीनगर येथील रहिवासी आहे. त्या दिनांक 11 नोव्हेंबर रोजी बाहेरगावी गेल्या होत्या. या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी रात्री कुलूप तोडून घरात प्रवेश केला व घरातील सोन्याची चेन, पांचाली, डोरले व रोख रक्कम असा एकूण 55 हजारांचा मुद्देमाल लंपास केला. याबाबत त्यांनी वणी पोलीस स्टेशन गाठत तक्रार नोंदवली.

भर दिवसा बाजारपेठेतून दुचाकी लंपास
विजय वामनराव मुळे (40) हे वणीतील ज्योतिबा फुले चौकातील रहिवासी आहेत. त्यांचे गांधी चौकात कपड्याचे दुकान आहे. बुधवारी दिनांक 10 नोव्हेबर रोजी ते स्टेट बँकेच्या शाखेत त्याची स्प्लेंडर (MH29 H7295) ही दुचाकी घेऊन गेले होते. बँकेच्या गल्लीत त्यांनी त्यांची दुचाकी पार्क केली. बँकेचे काम आटोपल्यावर ते परत आले असता त्यांना तिथे दुचाकी आढळून आली नाही. त्यांनी पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दाखल केली.

ना घर सुरक्षीत ना दुचाकी…
शहरात गेल्या तीन महिन्यांपासून सातत्याने चोरीच्या घटना घडत आहेत. यातील एकाही प्रकरणाचा छडा वणी पोलिसांना लावता आला नाही. तर दुसरीकडे चोरीच्या घटना काही केल्या थांबताना दिसत नाही. घर बंद असले की ते फुटलेच अशी समजूत सध्या वणीकरांची झाली आहे. एकीकडे घरफोडी सुरू असताना दुसरीकडे दुचाकी चोरटेही ऍक्टिव्ह झाले आहेत. त्यामुळे ना दुचाकी सुरक्षीत ना घर सुरक्षीत अशी परिस्थिती सध्या वणीकरांची झाली आहे. सातत्याने चोरीच्या घटनांमुळे वणीकर चांगलेच दहशतीत आले आहेत.

हे देखील वाचा: 

भूलथापा देऊन अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार, मुलगी गर्भवती…

रविवारी सुप्रसिद्ध सर्जन डॉ. आशुतोष जाधव (MBBS, MS) यांची वणीत व्हिझिट

पोलीस भरतीची तयारी करणा-या विद्यार्थ्यांचा वणीत विराट मोर्चा

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.