मारेगाव येथे कार व ट्रकची समोरासमोर भीषण धडक, कार चकनाचूर…

सब्बलच्या साहाय्याने काच फोडून व दरवाजा तोडून जखमी कारचालकाला काढले बाहेर

0
164

भास्कर राऊत, मारेगाव: शहरालगत मारेगाव-वणी रोडवर कार व ट्रकची समोरासमोर भीषण धडक झाली. शनिवारी संध्याकाळी 5.30 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात कार चालक गंभीर जखमी झाला. शुभम गोलर (28) रा. वणी असे जखमी कारचालकाचे नाव आहे. हा अपघात एवढा भीषण होता की यात कारचा समोरचा भाग चकनाचूर झाला. त्यामुळे जखमी कारचालकाला लोकांनी कारचा दरवाजा तोडून व काच फोडून बाहेर काढले.

वणीतील शुभम गोलर हा वणीतील तरुण त्याच्या अल्टो कारने मारेगाव येथे कामानिमित्त आला होता. संध्याकाळी 5.30 वाजताच्या सुमारास तो मारेगावहून वणी येथे परत जात होता. दरम्यान मारेगाव शहरापासून एक ते दीड ते किलोमीटर अंतरावर असलेल्या तुळशीराम बार समोर कारचालक शुभमच्या भरधाव कार एका ट्रकला समोरासमोर धडकली. या अपघातात कारचालक गंभीर जखमी झाला.

हा अपघात इतका भीषण होता की यात कारची समोरील भाग संपूर्ण चकनाचूर झाला व यात कारचालक फसला होता. हे भीषण दृष्य बघून रस्त्यावरील लोक व गावातील काही नागरिक घटनस्थळी पोहोचले व त्यांनी कारचालकाला कारबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. अखेर सब्बल आणि इतर काही अवजारे आणण्यात आले. अर्ध्या तासाच्या परिश्रमानंतर कारच्या काचा फोडून व दरवाजा तोडून जखमी कारचालकाला बाहेर काढण्यात लोकांना यश आले.

जखमीस मारेगाव ग्रामीण रूग्णालयात येथे उपचारासाठी नेण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने प्रथमोपचार करून चालकाला पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलवण्यात आले. दरम्यान अपघात होताच ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला. प्रकरणाचा तपास मारेगाव पोलीस करीत आहे.

हे देखील वाचा: 

रिलीफ फिजिओथेरपी क्लिनिकचे भव्य शुभारंभ

अपहरण व खंडणी प्रकरणातील 4 आरोपी जेरबंद

Relief Physiotherapy clinic
Previous articleअपहरण व खंडणी प्रकरणातील 4 आरोपी जेरबंद
Next articleघरफोडीच्या सत्राने मारेगाव हादरले, एकाच रात्री चोरट्यांनी फोडले दोन घरं
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी 2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.
Loading...