विवेक तोटेवार, वणी: सकाळी दुचाकीने ड्युटीला जात असताना वेकोलि कर्मचा-याचा अपघातात त्यांचा मृत्यू झाला. आज सकाळी 7.30 वाजताच्या दरम्यान भालर रोडवर ही घटना घडली. प्रवीण तुळशीराम वासेकर (56) असे मृतकाचे नाव आहे. गाडीसमोर रोहीचा कळप आडवा आल्याने हा अपघात झाला. तर त्यामागूच येणा-या दुस-या गाडीचाही याच ठिकाणी झाअपघातला. यात दुसरा दुचाकीस्वार जखमी झाल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार प्रवीण तुळशीराम वासेकर (55) रा. ओमनगरी लालगुडा हे वेकोलिच्या निलजई कोळसा खाणीत कार्यरत होते. सोमवारी दिनांक 15 मार्च रोजी सकाळी ते त्यांच्या दुचाकीने नेहमीप्रमाणे डुटीसाठी निघाले. 7.30 वाजता दरम्यान भालर रोडवरील जी एस ऑइल मीलजवळ त्यांच्या गाडीसमोर अचानक रोहीचा कळप आला. त्यामुळे त्यांचे गाडीवरचे नियंत्रण सुटले व त्यांचा अपघात झाला. यात त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला.
प्रवीण यांच्या अगदी मागेच जावेद शेख (38) राहणार विराणी टॉकीज जवळ वणी हे त्यांच्या दुचाकीने ड्युटीवर जात होते. प्रवीण यांची गाडी अचानक खाली पडल्यानंतर रोहीचा कळप जावेद यांच्या गाडीवरही धावून आला. त्यामुळे मागून येणा-या जावेद यांचेही गाडीवरचे नियंत्रण सुटले व त्यांच्या गाडीचा देखील त्याच ठिकाणी अपघात झाला. या अपघातात जावेद जखमी झाले आहे. त्यांच्यावर वणीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. ते वेकोलि उकणी खाणीत इलेक्टिशियन पदावर कार्यरत आहे.
प्रवीण यांना त्वरित वणीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु अपघातात रक्तस्त्राव अधिक झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मागे दोन मुले, एक मुलगी, पत्नी असा आप्तपरिवार आहे. अचानक अपघातात मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबासह परिसरात शोककळा पसरली आहे. प्रवीण यांची मुलगी पुणे इथे राहतात. त्या वणीला परतल्यावर प्रवीण यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाईल अशी प्राथमिक माहिती आहे.
रोही आणि रानडुकरांमुळे शेकडो अपघात
भालर रो़डवर रोही आणि रानडुकरांमुळे शेकडो अपघात झाले आहेत. यात अनेकांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जखमी देखील झाले आहेत. रोही आणि डुकरांमुळे झालेल्या अपघातात वेकोलि कर्मचा-यांचा अधिक समावेश आहे. जीएस ऑईल मील ही तर रोही आणि डुकरांचे घरच बनले आहे. जंगली श्वापदांचा या रस्त्यावर कायम वावर असला तरी याकडे प्रशासनाने मात्र दुर्लक्ष आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचा नाहक बळी जात आहे.
हे देखील वाचा: