मांगरुळजवळ दुचाकीला ट्रकची धडक, तिघे जखमी

वणीतील जैन ले आऊट येथील तरुणांचा अपघात

सुरेश पाचभाई, बोटोणी: मारेगाव लगत असलेल्या मांगरुळ येथे एका दुचाकीला अज्ञात ट्रकने भीषण धडक दिली. या अपघात तिघे तरुण जखमी झाले आहेत. आज दुपारी 4.30 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला.

Podar School 2025

सविस्तर वृत्त असे की मित विनोद झाडे वय 17, आयुष गजानन ढाले वय 21 व वंश पुंडलिक झाडे वय सुमारे 18 वर्ष हे तिघेही वणीतील जैन ले आऊट येथील रहिवाशी आहेत. आज हे तिघे एका ऍक्टिव्हा या मोपेडने वणीहून नवरगाव येथे धरण बघण्यासाठी आले होते. दुपारी 4 वाजताच्या सुमारास ते तिघेही ट्रिपल सिट वणीसाठी निघाले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

दरम्यान 4.30 वाजताच्या सुमारास मांगरुळजवळ एका ट्रकला ओव्हरटेक करताना त्यांच्या दुचाकीला ट्रकची धडक बसली. या अपघातात तिघेही गंभीर जखमी झाले. यातील दोघांच्या पायाला व एकाच्या डोक्याला इजा झाली आहे. अपघात झाल्याचे कळताच घटनास्थळावरील नागरिकांनी तात्काळ ऍम्बुलन्स बोलवली. दोन ऍम्बुलन्समधून या तिघांना मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

डॉक्टरांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी रेफर केले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा केला. घटनेचा तपास मारेगाव पोलीस करीत आहे.

हे देखील वाचा:

भरदिवसा वणीत रंगला थरार, हल्लेखोरांचा चाकू घेऊन पाठलाग

दोन दुचाकीची समोरासमोर धडक, एक ठार तर दोन जखमी

 

 

Comments are closed.