जितेंद्र कोठारी, वणी: रेतीची अवैधरित्या वाहतूक करणा-या ट्रॅक्टरवर विशेष पोलीस पथकाने कारवाई केली. सदर कारवाई नायगाव (बु) ते पुनवट दरम्यान करण्यात आली. या प्रकरणी 3 आरोपींना अटक करण्यात आली असून 1 ब्रास रेती, ट्रॅक्टर, दुचाकी, मोबाईल असा एकूण 5 लाख 67 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शनिवारी संध्याकाळच्या दरम्यान विशेष पोलीस पथक शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. दरम्यान त्यांना खबरीकडून पुनवट जवळ एका ट्रॅक्टरद्वारा रेतीची अवैधरित्या वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पथकाने त्या दिशेने गाडी फिरवली. नायगाव (बु) ते पुनवट दरम्यान बोढाले यांच्या शेताजवळ त्यांना एक ट्रॅक्टर (MH29 BC4490) आढळला. त्या ट्रॅक्टरच्या समोर एक दुचाकीस्वार (MH29 AV9820) डबलसीट येत होता. पथकाने ट्रॅक्टर चालक व दुचाकी स्वाराला थांबवले. ट्रॅक्टरची पाहणी केली असता त्यात 1 ब्रास रेती होती.
चालकाला रेती वाहतुकीच्या परवान्याबाबत (रॉयल्टी) विचारणा केली असता तो नसल्याचे त्यांनी सांगितले. पथकाने ट्रॅक्टर जप्त करत चालक शंकर जयराम मडावी (45) रा. बेलोरा, ता. वणी याला ट्रॅक्टर मालकाबाबत विचारणा केली असता त्याने दुचाकीवर डबलसीट असलेला प्रवीण एकनाथ पिदूरकर (40) रा. सावंगी ता. वणी असल्याचे सांगितले. पथकाने ट्रॅक्टर चालक, ट्रॅक्टर मालक व दुचाकीस्वार गणेश रतन कोल्हे (32) रा. सावंगी ता. वणी या तिघांनाही ताब्यात घेतले. त्यांना रेतीबाबत विचारणा केली असता त्यांनी ती सावंगी येथून आणल्याचे सांगितले.
पथकाने घटनेचा पंचनामा करत एक ब्रास रेती ज्याची किंमत 6 हजार रुपये, ट्रॅक्टर व ट्रॉली ज्याची किंमत 5 लाख रुपये तसेच दुचाकी ज्याची किंमत 40 हजार रुपये, 3 मोबाईल ज्याची किंमत 21 हजार रुपये असा एकूण 5 लाख 67 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी शंकर जयराम मडावी (45), प्रवीण एकनाथ पिदूरकर (40), गणेश रतन कोल्हे (32) या तिघांवरही भादंविच्या कलम 379, 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांच्या मार्गदर्शनात सपोनि मुकुंद एस. कवाडे, पो.कॉ. राजू बागेश्वर, पोलीस नाईक जितेश पानघाटे, मुकेश कारपते, मिथुन राउत, निलेश भुसे, अजय वाभिटकर, वाहन चालक महेश धामनकर यांनी केली.
हे देखील वाचा:
[…] […]