नागेश रायपुरे, मारेगाव: बीड जिल्ह्यात समाजकल्याण विभागात सहायक आयुक्त पदावर कार्यरत असलेले अधिकारी मारेगाव शहराचे भूमिपुत्र तथा सेवा निवृत्त तहसीलदार शंकरराव मडावी यांचे सुपुत्र डॉ. सचिन शंकरराव मडावी यांनी ऐन कोरोनाच्या आपत्कालीन परस्थितीमध्ये मदतीला धावलेत. मारेगाव तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्य सेवेकरिता रुग्णवाहिका सेवेत दिली. शंकरराव मडावी यांनी या रुग्णवाहिकेचं लोकार्पण केलं. त्यांचे मारेगावकर आभार मानून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
काही दिवसांपूर्वी मारेगाव शहरातील एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे तिचा मृतदेह घनकचऱ्याच्या गाडीत नेण्यात आला. ही बाब माणुसकीला काळिमा फासणारी होती. माणूस मेल्यानंतरही त्याच्या मृतदेहाची एवढी फरफट होत आहे. ही दुर्दैवी बाब मारेगावचे भूमिपुत्र असलेले डॉ.सचिन मडावी यांच्या मनाला ही बातमी चटका लावून गेली.
डॉ. सचिन मडावी त्यांनी तेव्हाच ठरविले की आपल्या गावासाठी रुग्णवाहिका(Ambulance) घ्यायची. मात्र सध्या कोरोनाच्या वातावरणात कोणीही Ambulance विकायला तयार नव्हते. तेव्हा त्यांनी एका दवाखान्याकडून रुग्णवाहिका( Ambulance) विकत घेतली. त्याला अद्ययावत केले आणि आपल्या स्वगावी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली.
बिरसा फाउंडेशनच्या माध्यमातून सेवानिवृत्त तहसीलदार शंकरराव मडावी व त्यांचे सुपुत्र डॉ. सचिन मडावी यांनी तालुक्यातील गाव पोडावर अनेक सामाजिक उपक्रम राबवून त्यांना मदतीचा हात दिला.
जन्मभूमीच्या मदतीला कधीही धावून येईन -डॉ. सचिन मडावी
माझ्या जन्मभूमीसाठी मी कोणत्याही परिस्थितीत धावून येईन. मारेगाव शहरातील विकासाचे काम असो, की कोणतीही आपत्कालीन परिस्थिती, मी मदतीसाठी कटीबद्ध राहीन. आज 2 मे पासून ही रुग्णवाहिका मारेगाववासीयांच्या सेवेत दाखल झाली आहे. ही सेवा 24 तास उपलब्ध आहे. कुठल्याही रुग्णाला गरज पडल्यास खालील खालील क्रमांकावर संपर्क साधावा.
शंकरराव मडावी (अध्यक्ष बिरसा फाऊंडेशन, मारेगाव)-9764985510
लक्ष्मीकांत तेलंग – 9423613635,आकाश भेले– 9404846714
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा