उद्या गरजूंना होणार वणीत कपडेवाटप

नव्यानेच सुरू झालेल्या संस्थेचा उपक्रम

1

जब्बार चीनी, वणी: या दिवाळीला अनेकांनी भारी भारी कपड्यांची खरेदी केली असेल. अनेकांच्या कपाटात भरगच्च कपडे पडलेही असतील. परंतु आजही अनेकांना कपडे नाहीत. ते उघड्यावरच थंडीत झोपतात. अंग झाकायला त्यांच्याकडे पुरेसे कपडेही नसतात. ही माणुसकीची जाण वणीकरांनी ठेवली. अशा गरजूंसाठी त्यांनी 22 नोव्हेंबरला रविवारी मोफत कपडेवाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे.

मराठी विज्ञान परिषद, गुरुदेव सेवा मंडळ, भारत स्वाभिमान ट्रस्ट व पतंजली योग समिती आदी संस्थांचे विविध सदस्य यात जुळलेले आहेत. दिवाळीच्या नंतरच्या शुक्रवारीदेखील उपक्रम झाला. हा उपक्रम नियमित राबवणयाचा सदस्यांचा मानस आहे. या संस्थेला अजूनही नाव द्यायचं आहे. लोक जुळत आहेत. असं प्रा. म. गो. खाडे यांनी सांगितलं.

जे निराधार, गरीब, दिव्यांग, श्रमजीवी आहेत त्यांना ह्या कपड्यांचे वाटप होणार आहे. त्यासाठी वणीकरांनी जुने वापरात असलेले चांगल्या स्थितीतले कपडे गोळा केलेत. गर्भश्रीमंत लोकांनी अगदी काही काळच वापरलेले कपडेदेखील त्यांनी गोळा केलेत.

पॅंट, शर्ट, साड्या, पातळ, शाल, सलवार-कुर्ता, स्वेटर, जर्कीन, लहान मुलांचे पोशाख, अनेक दानशूरांनी वणीकरांना दिलेत. रविवारी वणीतील नागपूर रोडवरील प्रगतीनगर येथील किड्स इंटरनॅशनल प्ले स्कूल येथे दुपारी 12 ते 2 या वेळेत हे कपडेवाटप होणार आहे.

गरजूंनी याचा लाभ घ्यावा. स्टॉक संपण्यापूर्वी त्यांच्या पसंती प्रमाणे दिलेल्या वेळेत कपडे न्यावेत. अशी विनंती प्रा. महादेव खाडे(8275297211), लक्ष्मण इद्दे(8275299896) , विजया दहेकर(8551051206), भारत गारघाटे, माया माटे यांनी केली आहे.

हेदेखील वाचा

वणीतील रेड लाईट एरियात पोलिसांची धाड, दोन मुलींची सुटका

हेदेखील वाचा

शुद्ध पाण्याच्या ‘कॅन’वर हरित लवादाचा ‘हातोडा’

 

 

1 Comment
  1. […] उद्या गरजूंना होणार वणीत कपडेवाटप […]

Leave A Reply

Your email address will not be published.