रेतीची तस्करी करणा-या दोन ट्रॅक्टर चालकांना अटक

चिखलगाव येथील घटना, 10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

1

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील चिखलगाव येथे शनिवार 21 नोव्हेंबर रोजी रेती तस्करी करणारे दोन ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहे. या ट्रॅक्टर मध्ये दोन ब्रास रेती आढळून आली आहे. सदर कारवाईत दोन ट्रॅक्टर चालकांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सध्या जिल्हात रेती घाटाचा लिलाव झालेला नाही. या संधीचा फायदा अनेक रेती तस्कर घेत आहे. शनिवारी पहाटे 3 वाजताच्या सुमारास चिखलगाव येथे रेती तस्करी होत असल्याची माहिती पोलिसांना खबरीकडून मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी चिखलगाव येथील बोधे नगरच्या रस्त्यावर सापळा रचला.

रात्री 3.30 वाजताच्या सुमारास दोन ट्रॅक्टर येताना पोलिसांना दिसले. पोलिसांनी ट्रॅक्टर थांबवत ट्रॅक्टरची तपासणी केली असता त्यात 2 ब्रास रेती आढळून आली. याबाबत ट्रॅक्टर चालकांना विचारणा केली असता त्यांना याबाबत निट माहिती देता आली नाही.  पोलिसांनी त्वरित कारवाई करीत हे दोन्ही ट्रॅक्टर (MH 29 BC 9884) (MH29 AK 1563) ताब्यात घेतले व यात भरून असलेली 2 ब्रास रेती जप्त केली.

ट्रॅक्टर चालक गजानन मारोती वसाके (31) रा. चिखलगाव व संतोष दत्तू आवारी (34) रा. चिखलगाव यांना अटक केली. सपोनि संदीप एकाडे यांच्या फिर्यादवरून आरोपीविरुद्द भा.दं.वि. कलम 130 (1) आणि 50(अ)/177 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आले.

सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार वैभव जाधव, संदीप एकाडे, सुदर्शन वानोळे, इमरान खान, सुधीर पांडे, सुनील खंडागळे, रत्नपाल मोहाडे, अमित पोयाम, पंकज उंबरकर यांनी केली.

हे पण वाचा…

ऑटो अपघातात पिंपरीचे महादेव खंडाळकर यांचा मृत्यू 

हे पण वाचा…

वणीतील रेड लाईट एरियात पोलिसांची धाड, दोन मुलींची सुटका

Leave A Reply

Your email address will not be published.