गवारा ग्रामपंचायतीमध्ये कोविड 19 टेस्ट कॅम्प

उत्स्फूर्त प्रतिसाद, 90 नागरिकांनी केली चाचणी

0

सुशील ओझा,झरी: तालुक्यातील गवारा ग्रामपंचायतीद्वारा गावात कोविड 19 च्या टेस्ट कॅम्पचे आयोजन करण्यात आले. कॅम्प मध्ये गावातील 90 लोकांनी आपली चाचणी करून घेतली. जिल्ह्यासह तालुक्यात कोरोनाचा संसर्ग होऊन रुग्णांची संख्या वाढत आहे.

गावातील जनतेला कोरोनाच्या महामारीपासून दूर ठेवण्याच्या उद्देशाने तसेच गावात कोरोनाचा रुग्ण वाढू नये याकरिता ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन गावात कोरोना 19 चाचणीचा कॅम्प घेतला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

कॅम्प मध्ये गावातील 90 लोकांनी आपली चाचणी करून घेतली. त्यावेळी सरपंच जया मेश्राम, उपसरपंच प्रवीण गुरनुले, पोलिस पाटील चरणदास गंद्रतवार, तलाठी खैरे, ग्रामसेवक संदावार व इतर ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

हेदेखील वाचा

हेदेखील वाचा

हेदेखील वाचा

उत्पादन शुल्क निरीक्षकाने अडीच लाखांची मागणी केल्याचा आरोप

 

Leave A Reply

Your email address will not be published.