सुशील ओझा, झरी: कोरोनाचा प्रकोप थांबताना दिसत असतानाच तालुक्यात अचानक एकाच कुटुंबातील 5 जण कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण निघाल्याने खळबळ उडाली आहे. मंगळवारी 22 डिसेंबरला झरी येथे एका कुटुंबातील 9 व्यक्तींनी टेस्ट केली. यात 5 लोक पॉजिटीव्ह निघाले आहे. एकाच वेळी अर्धे कुटुंब पॉजिटिव्ह येत असल्याने तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या अधिक असल्याचा अंदाज बांधला जात आहे.
सदर कुटुंबातील एका व्यक्तीला चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे तर इतर रुग्णांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. सदर व्यक्ती प्रतिष्ठीत असल्याने या व्यक्तीचा परिसरात चांगला वावर होता. त्यामुळे खबरदारी म्हणून मुकुटबन, पाटण व इतर खेडेगावातील लोकांनी स्वतःहुन कोरोनाची तपासणी करून घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळी 11 ते 12.30 पर्यंत करता येणार कोरोना टेस्ट: गेडाम
सध्या अनेकांना कोरोनाचे लक्षणं आढळत नाही. मात्र असे रुग्ण हे कोरोना पसरवण्यास कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळे खबरदारी म्हणून परिसरातील नागरिकांनी झरी येथे टेस्ट करावी. झरी येथे सकाळी 11 ते 12.30 पर्यंत संशयीतांना कोरोनाची टेस्ट करता येणार
– डॉ. मोहन गेडाम, तालुका आरोग्य अधिकारी
हे देखील वाचा:
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक निवडणुकीत राजू येल्टीवार विजयी
हे देखील वाचा: