मारेगाव तालुक्यात आणखी एक आत्महत्या….

पांढरकवडा (ल) येथे शेतक-याची कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यातील आत्महत्यांच्या घटनांनी कहर मजवलेला आहे. एकापाठोपाठ एक आत्महत्या होत असताना तीन दिवस पडलेल्या खंडानंतर आज दि. 6 सप्टेंबरला पुन्हा एकाचा मृत्यू झाला. सुधीर रवींद्र गोलर 28 असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. तो तालुक्यातील पांढरकवडा (ल.) येथील राहिवासी होता.

तालुक्यातील पांढरकवडा (ल.) येथील सुधीर रवींद्र गोलर वय 28 या अविवाहित युवकाची पांढरकवडा सामायिक शेती आहे. तो शेती करून आपली आई व लहान भाऊ यांच्यासोबत राहत होता. रविवारी दि. 4 सप्टेंबरला दिवसभर शेतामध्ये सुधीरने बैल चारले. सायंकाळ 5 वाजताच्या सुमारास बैल बांधल्यानंतर शेतामध्ये असलेले मोनोसील नावाचे कीटकनाशक प्राशन केले. घरच्यांना याची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ सुधीरला मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

परंतु प्रकृती गंभीर असल्याने सुधीरला चंद्रपूर येथे हलविण्यात आले. दि. 4 तारखेपासून त्याची रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरू होती. अखेर आज दि. 6 सप्टेंबरला दुपारच्या सुमारास चंद्रपूर येथे उपचार सुरु असताना सुधीरची प्राणज्योत मालवली. त्याच्यामागे म्हातारी आई आणि एक लहान भाऊ आहे.

सुधीर हा अविवाहित होता. तो शेती करून उदरनिर्वाह करायचा. सतत होत असलेली नापिकी आणि यावर्षीचा दुष्काळ यामुळे आर्थिकदृष्ट्या तो खचलेला होता. अशातच सुधीरने आत्महत्येचे पाऊल उचलले, अशी माहिती मिळत आहे. सततच्या आत्महत्या तालुक्याला चटका लावून जात आहेत.

हे देखील वाचा: 

पोलिसांची धडाकेबाज कार्यवाही…. विविध धाडीत 24 खर्रे जप्त…

आरोग्य शिबिरात 1200 तर सामान्य ज्ञान स्पर्धेला 1600 विद्यार्थ्यांचा सहभाग

स्पर्श क्लिनिक येथे त्वचारोगांविषयी अत्याधुनिक उपचार सुविधा उपलब्ध

जाधव सर्जिकल क्लिनिकचे थाटात उद्घाटन

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.