मारेगावात राष्ट्रमाता जिजाऊ जयंती उत्साहात

बहुसंख्य महिलांनी घेतला सहभाग

0

नागेश रायपुरे, मारेगाव: मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड आयोजित सावित्री जिजाऊ दशरात्रौत्सवानिमित्त राष्ट्रमाता जिजाऊ जयंती स्थानिक जिजाऊ चौकात उत्साहात साजरी करण्यात आली.

राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांची ४९८ वी जयंती कार्यक्रमाच्या अध्यक्षा जिजाऊ ब्रिगेडच्या लीना पोटे होत्या. मारेगावचे तहसीलदार दीपक पुंडे, मराठा सेवा संघ अध्यक्ष ज्योतिबा पोटे, मसेसं मार्गदर्शक सुधाकर इंगोले, मसेसं जिल्हा कार्याध्यक्ष अनंत मांडवकर, संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष लहू जिवतोडे प्रामुखाने उपस्थित होते.

प्रथम जिजाऊ वंदनेने अभिवादन कार्यक्रमाला सुरवात झाली. अनेक महिलांनी जिजाऊ विचारांवर प्रकाश टाकला. मनोगत व्यक्त केले. यात प्रसिद्ध बालरोग चिकित्सक डॉ. सपना केलोडे, कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुषमा काळे, माजी नगराध्यक्षा इंदू किन्हेकर, सारिका गारघाटे,

माजी नगरसेविका जिजा वरारकर, बोंडे, गीता बोढे, शीतल पारखी, सारिका काल्हे यांसह असंख्य महिला व पुरुष उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिताली पोटे हिने केले. प्रास्ताविक लीना पोटे तर आभार अनामिक बोढे यांनी मानले. मिठाई वाटून समारोप करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कुंदन पारखी, राहुल घागी, किशोर जुनगरी यांनी परिश्रम घेतले.

हेदेखील वाचा

जळका येथे शेतकऱ्याची आत्महत्या

हेदेखील वाचा

सिंदी येथे विष प्राशन करुन आत्महत्या

हेदेखील वाचा

साई लॅपटॉप व कॉम्प्युटर गॅलरीमध्ये मकरसंक्रांती ऑफर

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments
Loading...