नागेश रायपुरे, मारेगाव: कोरोना महामारीमध्ये आरोग्यसेवा पुरविण्याऱ्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे मनोबल वाढविण्यासाठी ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट यवतमाळच्या माध्यमातून मारेगाव तालुक्यातील कोविड केअर सेंटर, उपआरोग्य केंद्र मार्डी आणि वेगाव आरोग्य केंद्र येथे सुरक्षा कीट वाटप करण्यात आल्या.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य अरुणा खंडाळकर, पंचायत समिती सभापती शीतल पोटे यांच्या हस्ते तालुका आरोग्य अधिकारी डॉ अर्चना देठे यांच्याकडे सुरक्षा किट सुपूर्द करण्यात आल्यात. आरोग्य अधिकारी म्हणाले आतापर्यंत आम्हाला अत्यंत महत्त्वाचे आणि गरजेचे साहित्य ज्यांचा आम्हाला तुटवडा जात असल्याने बऱ्याच अडचणी निर्माण व्हायच्या.
संस्थेने आमची गरज लक्षात घेता तत्काळ साहित्य उपलब्ध करून दिल्यामुळे संस्थेचे आरोग्य विभाग आभारी आहे. तसेच जि. प. सदस्य आणि पंचायत समिती सभापती यांनीसुद्धा संस्थेचे आभार मानले. एवढ्या मोठ्या प्रमाणात आरोग्य विभागाला अजूनही जिल्ह्यात मदत झाली नाही असे ते म्हणाले.
तसेच PHC वेगाव येथे जिल्हा परिषद अनिल देरकर आणि PHC मार्डी येथे ग्राम पंचायत सदस्य यांच्या हस्ते सुरक्षा किट वाटपाचा कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रकाश चहानकर, गणेश माणूसमारे, नीलेश गाडगे, देवेंद्र पोले शिक्षक, वैभव कवठे ग्रामीण मुक्ति ट्रस्टचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
एकूण फेस शिल्ड ५४ नग, पी पी इ किट. ६० नग,हॅन्ड ग्लोव्हज २००० नग, माक्स N95 ४०० नग, सॅनिटायजर स्प्रे.१५० नग, सॅनिटायजरकॅन (५ ली).९ नग, ओक्सिमिटर ६ नग, थर्मल गण, ६ नग, स्पायरोमीटर १०नग, प्रोटीन पावडर ५० नग इत्यादी साहित्य वाटप करण्यात आले.
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा