नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील बोटोनी (चि) येथे पोलिसांनी अवैध दारू व्यवसायांवर कार्यवाहीचा बडगा उगारला. एकाच दिवशी अवैधरित्या देशी दारूची विक्री करणाऱ्या तीन वेगवेगळ्या ठिकाणी धाड टाकली. या कार्यवाहीत 58 देशी दारूचे पव्वे जप्त कऱण्यात आले. तसेच तीन आरोपींना अटक करण्यात आली. मात्र त्यांना माल सप्लाय करणारा आरोपी फरार झाला.
हुसेन सोनबा सुरपाम (45), विठ्ठल गणपत मडावी (63), संजय वसंता चिकटे (39) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे असून ते सर्व बोटोनी रहिवाशी आहेत. तर विवेक नरहरी नरांजे (36) रा. सराठी हा आरोपी फरार झाला.
प्राप्त माहिती नुसार गेल्या अनेक दिवसा पासून बोटोनी परिसरात अवैधरित्या देशी दारूची विक्री होत असल्याची माहिती मारेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार जगदीश मंडलवार यांना मिळाली होती. दिनांक 19 नोव्हेंबर च्या रात्री मारेगाव पोलिसांनी सापळा रचला व बोटोनी येथे धाडसत्र राबवले.
पहिल्या कारवाईत आरोपी हुसेन सोनबा सुरपाम रा. बोटोनी याच्या कडून देशी दारूचे 180 मिलीचे 21 पव्वे. दुसऱ्या कारवाईत विठ्ठल गणपत मडावी रा.बोटोनी याच्या कडून देशी दारुचे 180 मिलीचे 19 पव्वे, तर तिसऱ्या कारवाईत संजय वसंत चिकटे याच्या कडून देशी दारूचे 18 पव्वे असे एकूण 58 देशीचे पव्वे जप्त करण्यात आले.
यात विवेक नरांजे हा आरोपी फरार झाला. तिन्ही आरोपींना विवेक नरांजे माल पुरवीत असल्याची कबुली अटक करण्यात आलेल्या आरोपीनी दिली. या प्रकरणी आरोपीवर 65 (अ) (ई) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला.
ही कारवाई वणी उप.वि.पो.अधिकारी संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात पो.नि.जगदीश मंडलवार, जमादार सुरेंद्र टोंगे, आनंद अचलेवर, राजू टेकाम, रजनीकांत पाटील, अजय वाभीटकर, अनिल गिणगुले यांनी केली तर त्यांना होमगार्ड यांनी सहकार्य केले.
हे देखील वाचा…
हे देखील वाचा…
हे देखील वाचा…