खाणीतील सुरक्षा रक्षकाला ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांची मारहाण

वेकोलिच्या घोन्सा खाणीतील घटना, दोघांवर गुन्हा दाखल

विवेक तोटेवार, वणी: घोन्सा कोळसा खाणीत सुरक्षा रक्षकाला दोघांनी मारहाण केली. मंगळवारी संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. मारहाण, शिविगाळ व सरकारी कामात हस्तक्षेप केल्या प्रकरणी दोन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपी हे ट्रान्सपोर्ट व्यवसायाशी संबंधीत असल्याची माहिती आहे.

आकाश देवराव कावडे (33) हा घोन्सा कोळसा खाणीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो. कोळसा खाणीत बंकरच्या खाली ट्रक लागतात. त्याममध्ये कोळसा लोड होतो. नंतर वजन होऊन ट्रक बाहेर पडतो. या सर्व प्रक्रियेकडे लक्ष ठेवण्यासाठी सुरक्षा रक्षक ठेवण्यात आला आहे. मंगळवारी दिनांक 5 मार्च रोजी आकाशची दुपारी 4 ते रात्री 12 अशी शिफ्ट होती.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास एक स्कॉर्पिओ गाडी येऊन बंकर जवळ थांबली. या ठिकाणी खासगी गाडी आणण्यास मनाई असल्याने आकाशने गाडीचालकाला गाडी बाहेर काढण्यास सांगितले. यावरून गाडीत बसलेला आरोपी महेश मातंगी (40) रा. मेघदूत कॉलनी चिखलगाव व त्यांच्या सोबत असलेल्या तिरुपती नामक एका व्यक्तीशी आकाशचा वाद झाला.

दरम्यान आरोपी महेश व तिरुपतीने आकाशला शिवीगाळ करीत मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत आकाशच्या डोळ्याला इजा झाली. हे दोघेही आरोपी आरोपी ट्रान्सपोर्टर असल्याची माहिती आहे. भीतीपोटी आकाशने ही घटना कुणालाही सांगितली नाही. परंतु दुसऱ्या दिवशी याबाबत वेकोलिच्या काही कर्मचाऱ्यांना ही घटना माहीत पडली. त्यांच्या सांगण्यावरून आकाश याने घटनेच्या दुसऱ्या दिवशी 6 मार्च रोजी तक्रार दिली.

तक्रारीवरून वणी पोलिसात कलम 332, 353, 504, 34 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनेचा तपास ठाणेदार अनिल बेहेरानी यांच्या मार्गदर्शनात पोउपनी दत्ता पेंडकर करीत आहे.

हे देखील वाचा: 

Comments are closed.