वासनांध भास-याची नजर फिरली, नवरा नसला की यायचा घरी…

विवाहितेवर बळजबरी लैंगिक अत्याचार करणारा गजाआड....

जितेंद्र कोठारी, वणी: भास-याने भावसुनेवर बळजबरी लैगिंक अत्याचार केल्याची घटना राजूर कॉलरी येथे उघडकीस आली आहे. गेल्या वर्षभरापासून वासनेत धुंद झालेला आरोपी हा घरी कुणी नसताना दारू पिऊन घरी जायचा. भावसुनेला धमकावून, मारहाण करून तो तिचे शोषण करायचा. याबाबत भास-यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. 

Podar School 2025

सविस्तर वृत्त असे की पीडिता ही राजूर कॉलरी येथील रहिवाशी आहे. ती तिचे पती व दोन मुलीसह राहते. पती मजूरी करतो. त्यामुळे बरेचदा तो कामानिमित्त बाहेरगावी राहायचा. पीडितेच्या घराजवळच आरोपी राहतो. आरोपीची पीडिता ही भावसून होते. नात्यात असल्याने आरोपीचे नेहमी पीडितेच्या घरी येणे जाणे सुरू असायचे. गेल्या वर्षी दिनांक 29 नोव्हेंबर रोजी रात्री 11 वाजताच्या सुमारास पीडितेचा नवरा घरी नसल्याचे पाहून आरोपीने पीडितेच्या घरात प्रवेश केला. तिथे त्याने पीडितेशी अतिप्रसंग केला. तसेच याबाबत कुणाला काहीही सांगू नको अशी धमकी ही त्याने दिली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

त्यानंतर पीडितेचा पती घरी नसला की आरोपी नेहमीच दारू पिऊन पीडितेच्या घरी यायचा. घरी तो पीडितेला धमकावून तिचे बळजबरी शारीरिक शोषण करायचा. गेल्या वर्षभरापासून हा प्रकार सुरू होता. दोन दिवसांआधी गुरुवारी दिनांक 7 ऑक्टोबर रोजी रात्री आरोपी पीडितेच्या घरी गेला. तिथे त्याने पीडितेला पट्याने जबर मारहाण केली. मुलीला जिवे मारण्याची धमकी देऊन तिचे जळजबरी शोषण केले. तसेच पीडितेला 2.5 लाखांची मागणी ही केली. 

वारंवार होणा-या मारहाणीमुळे व शारीरिक शोषणामुळे त्रस्त झालेल्या पीडितेने अखेर तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला. पीडितेने तात्काळ वणी पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी राजेंद्र (40) रा. राजूर कॉलरी याच्या विरोधात कलम 376 (2) N, 323, 504 नुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे.

प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार शाम सोनटक्के यांच्या मार्गदर्शात एपीआय शिवाजी टिपूर्णे करीत आहे.

हे देखील वाचा:

आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये नवरात्री स्पेशल ‘बिग धमाका’ ऑफर लॉन्च

Comments are closed.