Yearly Archives

2023

रास दांडिया 2023 ला सुरुवात, 1.25 लाखांची बक्षिसे

बहुगुणी डेस्क, वणी: जैताई माता दांडिया उत्सव समितीद्वारा रास दांडिया 2023 या गरबा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. छ. शिवाजी महाराज उद्यान येथे दिनांक 16 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर पर्यंत हा दांडिया उत्सव चालणार आहे. या उत्सवात सहभागी होणा-या…

नवरात्रीनिमित्त नवीन किंवा जुनी साडी दान करण्याचे आवाहन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: नवरात्रीनिमित्त गरजू व गरीब महिलांना साडी दान करण्याचा उपक्रम राबवला जात आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षीही स्माईल फाउंडेशन हा उपक्रम राबवत आहे. अनेक महिलांकडे साड्यांचा मोठा स्टॉक असतो. मात्र तो वापरणीत नसतो. अशा…

ऑटो चालकाचा प्रामाणिकपणा, दागिने व रक्कम असलेले पर्स केले परत

जितेंद्र कोठारी, वणी : वणीतील एक ऑटोरिक्षा चालकाने प्रवाशाने ऑटोमध्ये विसरलेले रोख रक्कम व दागिने असलेले पर्स पोलिसांच्या मदतीने प्रवाशाला परत करून प्रामाणिकपणेचा परिचय दिला आहे. अफसर खान हकीम खान रा. राजुर ता.वणी असे या इमानदार ऑटो चालकाचा…

तलाठ्याने पकडताच रेती खाली करून ट्रक्टर पळविले

जितेंद्र कोठारी, वणी : पैनगंगा नदी पात्रातून चोरट्या मार्गाने रेतीची वाहतूक करीत असताना दोन ट्रक्टर तलाठ्याने अडविले. मात्र दोन्ही ट्रक्टर चालकाने ट्राली मध्ये भरलेली रेती नदी पात्रात खाली करून ट्रक्टर पळवून नेले. तलाठ्याच्या तक्रारीवरून…

ब्रेकिंग- युवा शेतकऱ्याची कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या

जितेंद्र कोठारी, वणी : तालुक्यातील बोर्डा गावात एका युवा शेतकऱ्यांनी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना मंगळवार 17 ऑक्टो. रोजी सकाळी 9 वाजता उघडकीस आली. आनंद मनोहर नागरकर (44), रा. बोर्डा, ह.मु. छोरीया ले ऑउट वणी असे आत्महत्या…

घरून कॉलेजसाठी निघालेली अल्पवयीन विद्यार्थिनी बेपत्ता

जितेंद्र कोठारी, वणी : लहान भावाला कॉलेजला जाते म्हणून घरुन निघालेली अल्पवयीन विद्यार्थिनी परत घरी आलीच नाही. 2 दिवस नातेवाईक आणि मैत्रिणीकडे शोध घेऊनही ती मिळून आली नाही. शेवटी बेपत्ता मुलीच्या वडिलांनी वणी पोलीस स्टेशन गाठून त्यांची 17…

ड्युटीवर जाण्याच्या तयारीत असताना त्याला आला हार्टअटक

जितेंद्र कोठारी, वणी : हृद्यविकाराच्या धक्क्याने झरी जामणी तालुक्यातील मार्की येथील युवकाचा मृत्यू झाला. संजय भाऊराव मांडवकर (45) रा. मार्की असे मृतक युवकाचा नाव आहे. मृतक संजय हा टॉपवर्थ उर्जा या खाजगी कोलमाईन्स मध्ये कामगार होता. रविवार…

‘त्या’ घटनेचा रफीक रंगरेज कडून जाहीर निषेध

जितेंद्र कोठारी, वणी : जागेच्या वादावरून येथील नवकार फर्निचरची दुकान जेसीबी मशीन लावून उध्वस्त केल्याची घटनेचा आरोपीचे वडील रफीक रंगरेज यांनी तीव्र निषेध केला आहे. रफीक रंगरेज यांचे पुत्र समीर रंगरेज यांनी पंकज बन्सीलाल भंडारी…

मोटरसायकलच्या धडकेत महिला दुचाकीस्वार गंभीर जखमी

जितेंद्र कोठारी, वणी : मोपेडवर घराकडे जात असलेल्या महिलेच्या दुचाकीला मागून येणाऱ्या भरधाव मोटसायकलने जोरदार धडक दिली. या अपघातात मोपेडस्वार महिलेच्या डोक्याला मार तसेच डाव्या पायाला फ्रॅक्चर झाला. येथील ब्राह्मणी मार्गावर…

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीचे वारंवार लैंगिक शोषण

जितेंद्र कोठारी, वणी : लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीचे वारंवार लैंगिक शोषण करण्यात आले. ऐनवेळी मात्र तिला लग्नास नकार देण्यात आला. ही घटना वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. याप्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध…