डाॕ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

जि.प.व.प्राथ.शाळा,सिंधीवाढोणा येथे online उपक्रम

0

सुशील ओझा, झरी: शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. अशी शिक्षणाची महती सांगणारे तसेच शिक्षणासाठी, समाजाच्या कल्याणासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे विश्ववंदनिय, महामानव डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून जि.प.शाळा.सिंधीवाढोणा येथे दि.14 एप्रिल 2021 ला online कार्यक्रम घेण्यात आला.

कोवीड-19महामारीच्या उद्भवलेल्या परिस्थितीमुळे stay home safe home घरी राहा सुरक्षित राहा या अनुषंगाने शाळेचे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक सुनीलकुमार वाटेकर यांच्या नेतृत्वाखाली तसेच मार्गदर्शक गटशिक्षणाधिकारी प्रकाशजी नगराळे पं स.झरी यांच्या प्रेरणेतून ह्या भीमजयंतीच्या कार्यक्रमाचे आॕनलाईन आयोजन करण्यात आले

ह्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिवाकर महाकुलकार यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत सदस्य विनोद निखाडे, तंटामुक्तीचे अध्यक्ष मारोतराव घुगुल तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक दशरथजी येनगंटीवार, वामनराव जामदाडे, चंद्रकांत उईके उपस्थित होते.

सर्व मान्यवारांच्या हस्ते शाळेच्या आवारात सुरक्षित अंतर ठेऊन बांबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन तसेच दीप प्रज्वलीत करण्यात आले. सहावीतील विद्यार्थी धृप निखाडे याने गीतगायन करुन भीमवंदना दिली.कार्यक्रमाच्या प्रास्तविकेतून मुख्या. सुनिलकुमार वाटेकर यांनी कार्यक्रमाचा उद्देश तथा बाबासाहेबांच्या जीवनपटलावरील इतिहास ,त्यांची शिकवण,तत्वे , यावरील विचार स्पष्ट केले.

जि.प.शाळा कोसारा येथील शिक्षक गावंडे यांनी सर्वांना शुभेच्छा देऊन मनोगत व्यक्त केले. शाळेतील विद्यार्थ्यांनी इग्रंजी, मराठी, हिन्दी ह्या तिन्ही भाषेतून भाषणे तथा गीतगायन केले. यामध्ये सहभागी विद्यार्थी सोनाक्षी निखाडे, शंकर निखाडे, प्रवीण मेश्राम, आदर्श महाकुलकार ,कीर्तिका निखाडे, धनश्री निखाडे, वैष्णवी येमुर्लेवार, वेदिका महाकुलकार, आकांक्षा निखाडे, यश निखाडे,आर्यन कुर्ले,समीक्षा येनगंटीवार, खुशबु निखाडे, वैष्णवी मोहुर्ले,आचल उइके, आरती बावणे, सायली मुद्दमवार होते.

यानंतर गामपंचायत सदस्य विनोद निखाडे यांनी मनोगत व्यक्त करतांना विद्यार्थी व शिक्षकांचे भरभरुन कौतुक केले, यापुढेही शिक्षणाचे कार्य असेच सुरु राहो अशी आशा व्यक्त केली. शाळेतील शिक्षिका हर्षदा चोपणे यांनी बाबासाहेबांचे शिक्षणाप्रती असलेले विचार व्यक्त केले. पुस्तक हे आपले मिञ आहे ,पुस्तकांशी मैञी करा.हा संदेश विद्यार्थ्यांना दिला.

शाळेतील पदवीधर शिक्षक बालाजी मुद्दमवार सर यांनी बाबासाहेबांच्या बालपणातील एक प्रसंग गोष्टरुपात विद्यार्थ्यांना सांगितला .व ह्या कार्यक्रमाची सांगता सर्वांचे आभार व्यक्त करुन झाली. ह्या कार्यक्रमाचे online संचालन नेहा गोखरे सहा.शिक्षका यांनी केले.

हेदेखील वाचा

‘बा भीमा’ ही सिंफनी स्टुडिओची डॉ. बाबासाहेबांना स्वरांजली 18 ला

हेदेखील वाचा

लॉकडाऊनमध्ये मयूर मार्केटिंगतर्फे ऑनलाईन सेवा सुरू

 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.