जितेंद्र कोठारी, वणी: सुभाष चौक येथील रहिवाशी समाजसेवक गणेश विठ्ठल सुंकुरवार (54) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. नांदेड येथील एका खासगी दवाखान्यात उपचारादरम्यान आज दुपारी 2 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. वणी येथील सुप्रसिद्ध कंत्राटदार रमेश सुंकुरवार यांचे ते लहान भाऊ होते.
गणेश सुंकुरवार यांची 4 दिवसापूर्वी तब्येत खराब झाली होती. चंद्रपूर येथे सी टी स्कॅन व इतर चाचण्या करण्यात आली. त्यानंतर त्यांना नांदेड येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर नांदेड येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची महिती आहे.
शिवसेनेचे युवा कार्यकर्ता सुभाष ताजने यांची आज सकाळी मृत्यूच्या वार्तापाठोपाठ गणेश सुंकुरवार यांच्या मृत्यूने वणीकर नागरिकांना धक्का बसला आहे. वणी बहुगुणी तर्फे गणेश सुंकुरवार यांना श्रद्धांजली.
हे देखील वाचा: