भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यातील एका वसतीगृहात शिक्षण घेणा-या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवण्यात आल्याची तक्रार देण्यात आली. या प्रकरणी मारेगाव पोलीस ठाण्यात मुलीच्या पालकांनी तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी ही तालुक्यातीलच एका ज्युनिअर कॉलेजमध्ये शिक्षण घेते. ती होस्टेलमध्ये राहून शिक्षण घेते. सध्या कोरोनामुळे कॉलेज बंद करण्यात आल्याने वसतीगृह देखील बंद करण्यात आले आहे. वसतीगृह बंद झाल्याची कल्पना मुलीने तिच्या पालकांना न देता ती बेपत्ता झाली.
वसतीगृह बंद झाल्याची माहिती मुलीच्या पालकांना मिळाली मात्र मुलगी घरी न पोहोचल्याने त्यांची चिंता वाढली. त्यांनी अधिक माहिती काढली असता त्यांना मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा संशय आला. यावरून त्यांनी मारेगाव पोलीस स्टेशन गाठत याबाबत अज्ञात तरुणाविरोधात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी आरोपीच्या विरोधात भादंविच्या कलम 363 नुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास बिट जमादार आनंद अलचेवार करीत आहे. प्राप्त माहितीनुसार मुलीने एका तरुणाला एका गावात मोबाईलवर कॉल करून बोलवले व त्या तरुणासोबत ती पसार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलीस मुलीचा शोध घेत आहे.
हे देखील वाचा:
Comments are closed.