जितेंद्र कोठारी, वणी: कोळसा भरून येत असलेला ट्रक पलटी होऊन झालेल्या अपघातात वणी येथील तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला. वणी वरोरा मार्गावर गुंजचा मारोती जवळील संविधान चौक येथे गुरुवार 3 फेब्रु. रोजी मध्यरात्री ही घटना घडली. सूरज अमर मेडते (30) रा. सरोदय चौक वणी असे मृत तरुणाचे नाव आहे. मृतक सूरजच्या वडीलाच्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
प्राप्त माहितीनुसार (MH29BG4283) क्रमांकाचा ट्रक गुरुवारी रात्री 12 वाजता दरम्यान कोळसा भरून वणीच्या दिशेने येत होता. दरम्यान वणी वरोरा मार्गावर संविधान चौकावर वळण घेत असताना ट्रक अचानक पलटी झाला. यात ट्रकच्या कंडक्टर साईडमध्ये बसलेल्या सूरज मेडते याच्या डोक्याला जबर मार लागून तो गंभीररीत्या जखमी झाला. तर ट्रक चालक विनोद गौरकर किरकोळ जखमी झाला.
अपघात होताच पीटीसी कंपनीच्या अॅम्ब्युलेन्सने गंभीर जखमी सूरजला तात्काळ वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्राथमिक उपचारानंतर त्याला चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले. चंद्रपूर येथील डॉ. मेहरा यांच्या दवाखान्यात उपचार सुरू असताना शुक्रवारी पहाटे 3.30 वाजता दरम्यान जखमी सूरजचा मृत्यू झाला.
गेल्या महिन्यातच झाले होते लग्न
मृतक सूरज मेडते याचे एक महिन्यापूर्वीच लग्न झाल्याची माहिती आहे. मृतकाचे वडील अमर मेडते यांनी वणी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी ट्रक चालक विनोद डोमाजी गौरकार (37), रा. सावरकर चौक वणी विरुद्द कलम 297, 304 (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.
हे देखील वाचा:
बॅटमन आलाये भेटीला…. सुजाता थिएटरमध्ये दु. 12.15 वा. रोज एक शो
Comments are closed.