वणीतील उर्दू शाळेत मूलभूत सोयी सुविधांचा अभाव

सोयीसुविधा न दिल्यास शाळेला ठोकणार 'टाळे', सपचा इशारा

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहरातील जिल्हा परिषद उर्दू शाळेची सध्या प्रचंड दुरवस्था आहे. शिक्षकांची कमतरता, स्वच्छतागृहाचा अभाव, स्वच्छता इत्यादी समस्येशी ही शाळा सध्या सामना करीत आहे. याबाबत वेळोवेळी प्रशासनाकडे निवेदन देण्यात आली होती. मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. याबाबत समाजवादी पक्षाचे राज्य कोषाध्यक्ष रज्जाक पठाण यांच्या उपस्थितीत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाल यांना निवेदन देण्यात आले आहे. जर शाळेला लवकरात लवकर सोयी सुविधा मिळाल्या नाही तर शाळेला टाळे ठोकणार असा इशाराही समाजवादी पक्षातर्फे देण्यात आला आहे.

वणीतील मुख्य भाजी मंडई परिसरात जिल्हा परिषदेची उर्दू शाळा आहे. या शाळेत मुस्लिम समाजातील विशेषता गरीब कुटुंबातील मुलेमुली शिक्षण घेतात. या शाळेत अधिकाधिक मुली आहेत. शाळेत इयत्ता 7 वी पर्यंत वर्ग आहेत. मात्र या सात वर्गाची मदार अवघ्या 2 शिक्षकांवर आहे. तर मुख्याध्यापक शाळा व्यवस्थापनात व्यग्र असतात त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. विशेष म्हणजे उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांना मराठी माध्यमातील शिक्षक शिकवत आहे.

शाळेत सफाई कर्मचारी नसल्याने शाळेची स्वच्छता होत नाही. विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतागृह नाही. शाळेला वॉल कम्पाउंड नसल्याने रात्रीच्या वेळेत मद्यपींचा इथे ठिय्या असतो. अशा विविध समस्यांना वाचा निवेदनातून फोडण्यात आली आहे. स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, प्रत्येक विषयाला स्वतंत्र शिक्षक असावा, तसेच शाळेत सफाई कर्मचा-याची व्यवस्था करावी अन्यथा शाळेला ताळे ठोकून यवतमाळ येथील जिल्हा परिषद कार्यालयासमोर शाळा भरवली जाईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

निवेदन देते वेळी रज्जाक पठाण, शेख आमिर, शेख कामिल, समीर बेग, नावेद अहमद, मुश्ताक काजी, फिरोज पठाण, अदनान पठाण इद्यादी उपस्थित होते.

हे देखील वाचा: 

पोलिसांची धडाकेबाज कार्यवाही…. विविध धाडीत 24 खर्रे जप्त…

आरोग्य शिबिरात 1200 तर सामान्य ज्ञान स्पर्धेला 1600 विद्यार्थ्यांचा सहभाग

स्पर्श क्लिनिक येथे त्वचारोगांविषयी अत्याधुनिक उपचार सुविधा उपलब्ध

जाधव सर्जिकल क्लिनिकचे थाटात उद्घाटन

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.