जैताई दर्शनासाठी मोफत ऑटो सेवा, रंगनाथ मंदिर ते जैताई देवस्थान राहणार सेवा

क्रांती युवा संघटनेचा उपक्रम, आजपासून सेवेला सुरुवात

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणीतील क्रांती युवा संघटनेच्या वतीने शहरातील विविध भागातील भाविकांना माता जैताईचे दर्शन घेण्याकरिता मोफत ऑटो सेवा सुरू करण्यात आली आहे. आज दिनांक 28 सप्टेंबर 2022 ला सकाळी 6 वाजता जैताई मंदिर परिसरातून ही सेवा सुरू झाली. यावेळी उदघाटक म्हणून क्रांती युवा संघटनेचे संस्थापक राकेश खुराणा, मुन्ना महाराज तुगणायत, डॉ महेंद्र लोढा, ऍड सुरज महारतळे, राजुभाऊ गव्हाणे उपस्थित होते.

नवरात्रोत्सवात वणी शहराचे आराध्य दैवत म्हणून जैताई मातेची परिसरात ओळख आहे. नवरात्रोत्सवादरम्यान शहरातील विविध परिसरातील भाविक भक्त पहाटे पासूनच देवस्थानात रिघ लावतात. यात मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग असते तसेच वृद्धही दर्शनासाठी येतात. मात्र अनेकांना ऑटो सेवा उपलब्ध होत नाही. त्यामुळे क्रांती युवा संघटनेच्या वतीने यावर्षीही मोफत ऑटो सेवा सुरू करण्यात आली आहे. स्व दिलीप हिरामण खडतकर, स्व दिनेश राजुरकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ ही सेवा सुरू करण्यात आली आहे.

भाविकांसाठी रंगनाथ स्वामी मंदिर ते जैताई मंदिर अशी ऑटो सेवा राहणार आहे. यात येण्या जाण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. क्रांती युवा संघटना ही गेल्या अनेक वर्षा पासून सतत नवरात्र मध्ये भाविकांना मोफत येण्या जाण्याची व्यवस्था करून दिली जाते.

 

यावेळी सतीश गेडाम, मारोती खडतकर, प्रमोद लोणारे, विजय गव्हाणे प्रितम एडलावार, निशांत पुनवटकर, आतिफ शेख, चांद सैय्यद, निखिल बेझलवार, सतीश नित, कपिल जुनेजा, दीपक मोरे, राहुल गेडाम, दिनेश गेडाम, रितीक खडतकर, वैभव खडसे, शेख हुसेन, संकेत उलमाले, आकाश नागतुरे, प्रितेश लाडसे, सुनील खडतकर, सुरज चाटे आदी क्रांती युवा संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

हे देखील वाचा: 

आजपासून जैताई नवरात्र महोत्सवाला सुरूवात, विविध कार्यक्रमांचे आयोजन

वणीकर पोरांचा नांदच खुळा..! घरीच बनविली हायड्रोजनवर चालणारी सेल्फ ड्रायव्हिंग कार

आता गोल्ड लोन मिळवा अवघ्या दहा मिनिटात… बजाज फायनान्सची सेवा

सुविधा कापड केंद्राला चोरट्यांनी लावली आग? आगीच्या प्रकरणात चोरीचा ऍन्गल समोर

 

Comments are closed.