नगरपालिका निवडणुकीसाठी वंचितची महाविकास आघाडीला खुली ऑफर

बहुगुणी डेस्क, वणी: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी (VBA) पूर्ण ताकदीनिशी उतरणार असून, विशेषतः वणी नगरपालिकेच्या निवडणुकीत जोरदार मुसंडी मारणार असल्याची भूमिका वंचितच्या वतीने पत्रकार परिषदेत मांडण्यात आली.…

मनसेची निवडणूक रणनिती ठरली; अर्जासाठी 6 नोव्हेंबर मुदत

बहुगुणी डेस्क, वणी: वणी – नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे बिगुल वाजताच सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नुकतेच एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करून आगामी…

शिवसेना (उबाठा) पक्षातर्फे उमेदवारी अर्ज प्रक्रिया सुरू

पुरुषोत्तम नवघरे,वणी: आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने वणी तालुक्यातील कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीसाठी सज्जतेचा इशारा दिला आहे. आमदार संजय देरकर व…

धावत्या कारला अचानक लागली आग, क्षणात झाली खाक

बहुगुणी डेस्क, वणी: वणी-यवतमाळ मार्गावरील यवतमाळ रोडवरील चिखलगाव परिसरात एका धावत्या कारला आग लागली. यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कार जळूव खाक झाली. शनिवारी रात्री सव्वा १० वाजताच्या चिखलगाव जवळ ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच…

अखेर रात्री चिमुकल्या इनायाची देखील प्राणज्योत मालवली

विवेक तोटेवार, वणी : वणी-घुग्घुस रोडवरील जन्नत हॉटेलजवळ शुक्रवारी सकाळी घडलेल्या भीषण अपघातात वणीतील एका कुटुंबावर अपरिमित दुःखाचा डोंगर कोसळला. या अपघातात कारमधील तीन मुलींचा जागीच मृत्यू झाला होता, तर त्यांचे वडील रियाजुद्दीन शेख यांनीही…

राष्ट्रीय एकता दिनानिमित्त वणीतील ओबीसी वेल्फेअर असोसिएशनतर्फे भव्य रक्तदान शिबिर

पुरुषोत्तम नवघरे, वणी: लाेह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त व “राष्ट्रीय एकता दिवस” या निमित्ताने वणी उत्तर क्षेत्रातील Backward Class (OBC) Coal Employees Welfare Associationच्या वतीने श्री हनुमान मंदिर, भाल्लर…

विवेकानंद विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा भावनांनी भरलेला स्नेहमिलन सोहळा

बहुगुणी डेस्क, वणी: वणीतील स्वामी विवेकानंद विद्यालयाच्या वर्ग 10वी (क) बॅच 2003-04 च्या माजी विद्यार्थ्यांनी तब्बल दोन दशकांनंतर पुन्हा एकदा शाळेच्या अंगणात आठवणींचा स्नेहसोहळा साजरा केला. रविवार, 26 ऑक्टोबर रोजी आयोजित या स्नेहसंमेलनाने…

सावंगी जुनी येथे तीन दिवसीय जगदंबा महोत्सव

पुरुषोत्तम नवघरे, वणी: सावंगी जुनी (ता. वणी) येथे जगदंबा माऊली देवस्थान आणि ग्रामस्थांच्या वतीने तीन दिवसीय जगदंबा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. 1 ते 3 नोव्हेंबर 2025 या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. मंदिर…

कर्जमाफीच्या मागणीसाठी घोंसा-वागदरा शेतकऱ्यांचा एल्गार

बहुगुणी डेस्क , वणी: नागपूर येथे झालेल्या एल्गार मोर्चाच्या दबावामुळे राज्य शासनाने ३० जून २०२६ पर्यंत संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य किसान सभेने सध्या आंदोलन स्थगित केले आहे. या मोर्चात घोंसा-वागदरा जि.प.…

गुरुवारी सकाळी वणीत भव्य मॅराथॉन, पोलीस दलाचे आयोजन

बहुगुणी डेस्क , वणी: देशाच्या एकता आणि अखंडतेचा संदेश देणाऱ्या “रन फॉर युनिटी” मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन वणीत उद्या 31 ऑक्टोबर रोजी करण्यात आले आहे. ही दौड 5 किलोमीटरची असून सकाळी 7 वाजता टिळक चौक वणी येथून मॅराथॉनला सुरुवात होणार आहे. वरोरा…