मारेगाव तालुक्यात कोरोनाचा वाढता कहर

46 पॉझिटिव्ह, ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या 170

0

नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा कहर वाढला असून आरोग्य विभागाला काल मिळालेल्या अहवालानुसार मारेगाव तालुक्यात चक्क 46 पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने खळबळ माजली आहे.तालुक्यातील ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या 171 वर पोहचली आहे.

यात रेपीड टेस्टद्वारे मारेगाव शहरातील प्रभाग क्र.2,3,5,13,14,17 मध्ये प्रत्येकी एक तर घोडदरा, नवरगाव, चोपण येथे प्रत्येकी एक तर कोलगाव 2, करणवाडी 3, जळका 2 तर गाडेगाव येथे चक्क 20 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. तर आरटीपीसीयार द्वारे कोलगाव 1, मारेगाव 1, वणी 2, चिखलगाव 4 असे एकूण 46 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

तालुक्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या 170 वर पोहचली असून यापैकी मारेगाव येथील कोविड सेंटर वर 40 तर होम क्वारणटाईन 82, तर उर्वरित खाजगी दवाखान्यात उपचार घेत आहे.

  प्रशासनास सहकार्य करा 

स्वतःला व आपल्या कुटूंबाला कोरोना पासून सुरक्षित ठेवण्यासाठी नागरिकांनी कोरोना लस घ्यावी.व ज्यांना लक्षणे आढळताच त्यांनी स्वतः येऊन कोरोनाची टेस्ट करावी. व स्वतःला आपल्या कुटुंबाला कोरोना पासून बचाव करावा.सध्याची परस्तीती लक्षात घेता शक्यतो बाहेर जाणे टाळावे.नेहमी मास्क,सोनिटाईझर चा वापर करावा.”कोविड 19″ च्या नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे.

– डॉ. अर्चना देठे (तालुका आरोग्य अधिकारी)

हेदेखील वाचा

हेदेखील वाचा

Leave A Reply

Your email address will not be published.