मारेगाव तालुक्याला आज दिलासा…!

आज 9 पॉजिटिव्ह तर 45 व्यक्तींनी केली कोरोनावर मात

0

नागेश रायपुरे, मारेगाव: आज 20 मे रोजी तालुक्यात केवळ 9 पॉझिटिव्ह आढळलेत. तर 45 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. रुग्णसंख्येचा दर कमी झाल्याने तालुक्याला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. तर आज तालुक्यातील सारीचा संशयित पेशंट यवतमाळ येथे रेफर करण्यात आला आहे.

आज आरोग्य विभागाने 379 व्यक्तींचे रॅपीड ऍन्टिजन टेस्ट केली. त्यात केवळ 9 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. तसेच आज 308 व्यक्तींची आरटीपीसीआर टेस्ट केली,  त्याचे नमुने यवतमाळ येथे तपासणी करिता पाठवण्यात आले आहे. तसेच 1010 व्यक्तींचा आरटिपीसीआर रिपोर्ट पेंडिंग आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

तालुक्यात सध्या 188 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यात कोविड सेंट वर 23 रुग्ण उपचार घेत आहे तर 147 होम आयसोलेट आहे. डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटरवर 8 तर 10 रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. तालुक्यात एकीकडे रुग्णांची संख्या कमी होत आहे तर दुसरीकडे कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे तालुक्याला दिलासा मिळत आहे.

हेदेखील वाचा

हेदेखील वाचा

हेदेखील वाचा

वणी व झरी येथील नायब तहसीलदारांची बदली

 

Leave A Reply

Your email address will not be published.