जितेंद्र कोठारी, वणी: सीसीआयच्या कापूस खरेदीकेंद्रावर कापूस विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांच्या वाहनातून कापूस खाली (अनलोडिंग) करण्याची हमाली शेतकऱ्यांकडून घेऊ नये. असे आदेशाचे पत्र भारतीय कापूस महामंडळाच्या वतीने अकोला विभागांतर्गत कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे सचिव/सभापती तसेच केंद्रप्रमुखांना पाठविण्यात आले आहे.
सीसीआय आणि जिनिंग प्रेसिंग कारखानदारांमध्ये झालेल्या करारानुसार शेतकऱ्यांच्या वाहनातून कापूस खाली करण्याची तसेच कापूस गाठी चढविण्याची हमाली जिनिंग प्रेसिंगकडून भरणा करण्यात येईल. सीसीआयचे अकोला विभागीय महाप्रबंधक अजय कुमार यांच्यासहीने
सर्व बाजार समिती तसेच अकोट, बार्शीटाकली, चिखलगाव, हिवरखेड, मूर्तिजापूर, पारस, पातूर, धामणगाव, येवदा, चिखली, खामगाव, मलकापूर, नांदुरा, भद्रावती, धानोरा, सोनूर्ली, राजुरा, कळमेश्वर, नरखेड, परशिवणी, आर्वी, देवळी, हिंगणघाट, कांडली, सेलू, सिंदी रेल्वे, वायगाव, अनसिंग, मंगरुळपीर, दारव्हा, घाटंजी, खैरी, मुकूटबन, पांढरकवडा, राळेगाव, शिंदोला व वणी खरेदी केंद्र प्रमुखांना 16 डिसेंबर रोजी पत्र पाठविण्यात आले आहे.
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा