कोरंबी (मा.)चे सरपंच विकास भोंगळे यांचे निधन

बोर्डा उपसरपंचांच्या पाठोपाठ कोरंबी सरपंचाच्या निधनाने शोक

0

जितेंद्र कोठारी, वणी : तालुक्यातील कोरंबी (मारेगाव) ग्रामपंचायतीचे सरपंच विकास रमेश भोंगळे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. नागपूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान गुरुवार 14 मे रोजी भोंगळे यांची प्राणज्योत मालवली. ते वसंत सहकारी जिनिंगचे संचालक तसेच नगर सेवक राजू भोंगळे यांचे भाऊ होते.

Podar School 2025

विकास यांच्यावर काही दिवसांपासून चंद्रपूर येथे उपचार सुरू होता. गेल्या आठवड्यात प्रकृती अस्वस्थतेमुळे ते चंद्रपूर येथे भरती झाले होते. दरम्यान त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना नागपूर येथे एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी  दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगी, आई वडील, भाऊ व मोठा आप्त कुटुंब आहे. विकास भोंगळे यांच्या मृतदेहावर आज शुक्रवार 15 मे रोजी वणी येथील मोक्षधाम मध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी बोर्डा (रासा) गावचे उपसरपंच अनिल मडावी यांचे निधन झाले होते. त्यांच्या पाठोपाठ एका आठवड्यात कोरंबीचे सरपंच विकास भोंगळे यांच्या निधनाने तालुक्यावर शोककळा पसरली.

हेदेखील वाचा

हेदेखील वाचा

हदेखील वाचा

वणीमध्ये आलाये पाण्याच्या टाकीचा डॉक्टर

Leave A Reply

Your email address will not be published.