अनुसयाबाई गाणार यांचे दीर्घ आजाराने निधन

0

नागेश रायपुरे, मारेगाव: आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या अनुसयाबाई शत्रुघ्न गाणार (78) यांचे आज 14 में रोजी पहाटे 3.55 वाजता दरम्यान दीर्घ आजाराने निधन झाले आहे.

अनुसयाबाई गाणार ह्या वंचीत बहुजन आघाडीचे माजी तालुका अध्यक्ष तथा फुले आंबेडकर प्रतिष्ठान संस्थेअंतर्गत संकेत महाविद्यालयचे अध्यक्ष तथा विमा अभिकर्ता, सामाजिक कार्यकर्ते विनोद गाणार यांच्या माता होत्या.

अनुसयाबाई गाणार ह्या किडनी आजाराने ग्रस्त होत्या. आज पहाटे 3.55 दरम्यान त्यांचे निधन झाले.आज मारेगाव येथील स्मशानभूमीत ठीक 11.30 वाजता दरम्यान यांच्यावर अंत्यविधी करण्यात येणार आहे. त्यांच्या मागे विनोद गाणार, प्रमोद गाणार ही दोन मुलं आणि वंदना कांबळे ही एक मुलगी, नातवंड असा मोठा आप्तपरिवार आहे.आंबेडकरी चळवळीतील जुन्या महिल्या कार्यकर्त्या काळाच्या पडद्याआड गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

हेदेखील वाचा

उधारीचे पैसे मागितल्याने युवकाची महिलेस मारहाण

हेदेखील वाचा

रमजान ईद साधेपणाने साजरी करा, प्रशासनाचे आवाहन

हेदेखील वाचा

लॉकडाऊनमध्ये मयूर मार्केटिंगतर्फे ऑनलाईन सेवा सुरू

Leave A Reply

Your email address will not be published.