भालर येथे शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
भालर व खांदला येथे शिवजयंती उत्साहात साजरी... शिवरायांचे विचार व्यवहारात आणणे गरजेचे - संजय देरकर
पुरुषोत्तम नवघरे, वणी: तालुक्यातील भालर व खांदला येथे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला संजय देरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. भालर येथे शेकडो तरुणांनी शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश घेतला. गावातील माजी ग्रामपंचायत सदस्य व विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा समावेश आहे. तर खांदला येथे खंडू पाटील डोईफोडे (बार्शी) सातारा यांचे व्याख्यान आयोजित कऱण्यात आले होते.
भालर येथील शिव महोत्सव समितीच्या वतीने महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करून गावातून मिरवणूक काढण्यात आली. शिवजयंती महोत्सवाचे उदघाटक म्हणून संजय देरकर होते तर प्रमुख पाहणे म्हणून भालर गावातील सरपंच मंदा हेपट, संजय देठे, डॉ. जगन जुनघरी, प्रवीण खानझोडे, अर्चना हेपट, सुनीता देठे, प्रमोद दोडके, नीलेश उपरे होते. या कार्यक्रमाला गावातील मोठा जन समुदाय उपस्थित होता. दरम्यान शेकडो जणांनी संजय देरकर यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश घेतला.
खांदला येथे शिवजयंती उत्साहात
खांदला येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला दीप प्रज्वलन व हरार्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर जिजाऊ वंदना घेण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते गावातील 10 वी व 12 वी उत्तिर्ण होणा-या गुणवंत विध्यार्थ्यांचा कौटुंबिक सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमर डाहुले, तर कोमल लखमापूरे तर आभार पंकज ठावरी यांनी केले. यावेळी संजय देरकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
शिवरायांचे विचार व्यवहारात आणणे गरजेचे – संजय देरकर
शिवाजी महाराजांचे सर्वोत्कृष्ट नेतृत्व आणि समाज कल्याणासाठीचा आग्रह अनेक पिढ्यांसाठी प्रेरक ठरला आहे. सत्य आणि न्याय या मूल्यांशी शिवरायांनी कधीही तडजोड केली नाही. लोककल्याण, समानता, प्रजेची काळजी यामुळे ते जाणता राजा झाले. छत्रपती शिवाजी महाराज छत्रपतींनी समाजाला चारित्र्य दिले. त्यामुळे यांचे विचार केवळ शिवजयंती पुरतेच मर्यादित न राहता राजेंचे विचार आपल्याला व्यवहारात आणण्याचे गरजेचे आहे.
– संजय देरकर, नेते शिवसेना
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. जगन जुनघरी, भगवान मोहिते, नीलेश पिंपळकर, राजेंद्र ईद्दे, गणेश जेनेकर, जगदीश बोरपे, प्रफुल्ल बोथाडे, संतोष वासेकर, शालीकराव पत्रकार, गणेश जुमनाके, सुनीता आसूटकर, वर्षा पावडे, सुप्रिया गौरकर होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिव महोत्सव समितीचे सर्वेसर्वा व सरपंच हेमंत गौरकर व शिवजयंती महोत्सव समितीच्या स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.
हे देखील वाचा:
…आणि खुद्द नगराध्यक्षच राहायचे गैरहजर: सत्ता येऊनही तोटा झालेली टर्म
मारेगाव नगरपंचायतीमध्ये पुन्हा रंगले नाट्य, काँग्रेसचा चक्क भाजपला पाठिंबा
Comments are closed.