रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या ट्रकमुळे वाहतूक प्रभावित
अपघाताची शक्यता, मात्र वाहतूक विभाग सुस्तच
विवेक तोटेवार, वणी: शहरातील लालपुलिया परिसरात यवतमाळ महामार्गावर नेहमीच रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकांनी वाहतूक प्रभावित होत आहे. या ठिकाणी दुतर्फा उभ्या असलेल्या ट्रकमुळे कायमच अपघात होतात. मात्र तरी देखील वाहतूक विभाग याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे.
वणी विभागात मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक होते. त्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण होऊ नये म्हणून वाहतूक उपशाखेची निर्मिती करण्यात आली आहे. परंतु ही वाहतूक शाखेचे सध्या कर्तव्याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. वणी-यवतमाळ रोडवरील लालपुलीया परिसर हा वर्दळीचा मार्ग आहे. या रस्त्यावरून राजूर, मारेगाव येथून मोठया प्रमाणात जनता ये-जा करीत असते. यामार्गावर नेहमीच ट्रकांच्या लांबच लांब रांगा पहावयास मिळतात. यामुळे वाहतूक करणाऱ्या लहान वाहनाला जीव मुठीत घेऊन या रस्त्यावरून जावे लागते.
12 जून रोजी याच रस्त्यावर मुकेश कडू यांचा अपघात झाला. अपघातात ते जागीच ठार झाले होते. अशा घटना टाळता याव्या म्हणून वणीत वाहतूक उपशाखा आहे. परंतु वाहतूक विभाग याबाबत कोणतीही कार्यवाही करीत नाही. त्यामुळे संबंधीत विभाग ट्रान्सपोर्टच्या दावणीला तर बांधला गेला नाही अशी शंका उपस्थित केली जाते. विशेष महत्वाचे म्हणजे या रस्त्याने वाहतूक विभागाचे वाहन दिवसभर ये-जा करीत असते. परंतु कारवाई मात्र शून्य दिसून येते.
कुणालाही रस्त्यावरील वाहन बाजूला घेण्यास सांगितल्या जात नाही. याच रस्त्यावर गुल पेट्रोल पंप जवळ नेहमीच वाहतूक विस्कळीत असल्याचे दिसून येते. परंतु येथेही वाहतूक विभागाचे कर्मचारी वाहतूक सुरळीत करताना दिसत नाही. वाहतूक विभागाने याकडे लक्ष द्यावे अशी अपेक्षा शहरवासी करीत आहे.
हे देखील वाचा:
आरोग्य शिबिरात 1200 तर सामान्य ज्ञान स्पर्धेला 1600 विद्यार्थ्यांचा सहभाग
स्पर्श क्लिनिक येथे त्वचारोगांविषयी अत्याधुनिक उपचार सुविधा उपलब्ध
Comments are closed.