जितेंद्र कोठारी, वणी: वणी-घुग्गुस रोडवर सुरू असलेल्या कोंबड बाजारावर वणी पोलिसांनी धाड टाकली. रविवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत वणीतील तिघांना अटक करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळावरून सुमारे सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
सविस्तर वृत्त असे की वणी-घुग्गुस मार्गावरील वागदरा गावालगत असलेल्या एका बियरबारच्या मागील भागातील असलेल्या झुडपात कोंबड बाजार भरावला जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. रविवारी दिनांक 25 सप्टेंबर रोजी दुपारी 3.15 वाजताच्या सुमारास पोलिसांनी घटनास्थळ गाठले असता त्यांना सदर ठिकाणी कोंबड्यांची झुंज लावून त्यावर जुगार असल्याचे आढळले. खात्री होताच पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकली. धाड टाकताच घटनास्थळावर पळापळ झाली. मात्र तीघे जण पोलिसांच्या हाती लागले. तर इतर लोक पळून जाण्यास यशस्वी ठरले.
घटनास्थळावरून दानिश शकील शेख (21), चेतन किशोर राऊत (25) दोन्ही रा. रंगनाथ नगर, सादिक शेख सादिक वहाब (32) रा. शास्त्रीनगर वणी या तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली. त्यांच्या जवळून रोख 7 हजार 220 रुपये तर घटनास्थळावरून 3 दुचाकी व दोन झुंजीचे कोंबडे असा एकूण 2 लाख 17 हजार 720 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
अटक केलेल्या तीनही आरोपींवर महाराष्ट्र जुगार कायद्याच्या कलम 12 (ब), 12(क) नुसार गुन्हा दाखल केला आहे. सदर कारवाही एसडीपीओ संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार रामकृष्ण महल्ले, सपोनि शिवाजी टिपूर्णे, सपोनि प्रविण हिरे, पोका वसिम, दडमल, महेश यांनी केली. प्रकरणाचा तपास शिवाजी टिपूर्णे करीत आहे.
हे देखील वाचा:
वणीकर पोरांचा नांदच खुळा..! घरीच बनविली हायड्रोजनवर चालणारी सेल्फ ड्रायव्हिंग कार
आता गोल्ड लोन मिळवा अवघ्या दहा मिनिटात… बजाज फायनान्सची सेवा
रविवारी सुप्रसिद्ध सर्जन डॉ. आशुतोष जाधव (MBBS, MS) यांची वणीत व्हिझिट
आता वणीत स्लिप डिस्क व स्पॉंडीलीसिसच्या रुग्णांसाठी वरदान ठरलेली कायरोप्रॅक्टिक उपचार सुरू
Comments are closed.