अखेर स्वातंत्र्याच्या 74 वर्षांनंतर हटवांजरी पोडाला मिळणार पक्का रस्ता

'वणी बहुगुणी' इम्पॅक्ट: रस्त्याच्या कामासाठी निधी प्राप्त, कामाला सुरूवात...

सुरेश पाचभाई, बोटोणी: सध्या देशाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात पदार्पन केले आहे. मात्र इतके वर्ष होऊनही हटवांजरी (पोड) येथे जाण्यासाठी पक्का रस्ता नव्हता. त्यामुळे येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागायचा. विशेष म्हणजे पक्का रस्ता नसल्याने मारेगावला जाताना एका महिलेची बैलगाडीतच प्रसुती झाली होती. मात्र अखेर हटवांजरी (पोड) येथील ग्रामस्थांच्या रस्त्याच्या मागणीची दखल प्रशासनाने घेतली आहे. या कामासाठी 70 लाखांचा निधी प्राप्त झाला असून यातून रस्त्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. विशेष म्हणजे ‘वणी बहुगुणी’ने सर्वप्रथम ही समस्या समोर आणून याबाबत वेळोवेळी पाठपुरावा केला होता.

मारेगाव तालुक्यातील हटवांजरी (पोड) ही एक आदिवासी समाजातील लोकांची वस्ती आहे. सुमारे 25 कुटुंबाचे या पोडामध्ये वास्तव्य आहे. हटवांजरी या गावापासून पूर्वेस 2 की. मी अंतरावर हटवांजरी (पोड) वसलेले आहे. तर पोडा पासून उत्तरेस 2.5 की. मी अंतरावर वणी-यवतमाळ राज्य महामार्ग आहे. या मार्गावरून पोडातील नागरीक तालुक्याच्या ठिकाणी येतात. मात्र या पोडावरून मारेगावला जाण्यासाठी पक्का रस्ता नव्हता. त्यामुळे आठवडी बाजार, शिक्षण, आरोग्य सेवेसाठी येथील रहिवाशांना चिखल तुडवत कच्चा रस्ता पार करावा लागत होता. शिवाय या मार्गाने चार चाकी गाडी जात नसल्याने आजारी लोकांना चांगल्याच हाल अपेष्टा सहन कराव्या लागायच्या.

पक्का रस्ता द्यावा याबाबत इथल्या नागरिकांनी वेळोवेळी निवेदन दिले होते. अखेर प्रशासनाने याची दखल घेऊन रस्त्याच्या कामासाठी 70 लाखांचा निधी दिला आहे. हटवांजरी ते हटवांजरी पोड या रस्त्याच्या कामासाठी 2 कि.मी.चे खडीकरण व 600 मीटर डांबरीकरण करण्यात येणार आहे. सध्या या कामाला सुरुवात झाली असून रस्त्यावर जेसीबीने मुरून टाकण्याच्या काम सुरू आहे. लवकरच हे काम पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी दिली.

ग्रामस्थांनी मानले ‘वणी बहुगुणी’चे आभार
हटवांजरी ते हटवांजरी (पोड) इथल्या रस्त्याच्या समस्येबाबत सर्वप्रथम ‘वणी बहुगुणी’ने वृत्त प्रकाशित करून ही समस्या समोर आणली होती. त्यानंतर वेळोवेळी या कामाबाबत पाठपुरावा केला होता. सध्या रस्त्याच्या कामाला सुरूवात झाली असल्याने हटवांजरी पोड येथील ग्रामस्थांनी ‘वणी बहुगुणी’चे आभार मानले.

रस्त्याबाबत वणी बहुगुणीने घेतलेल्या जुन्या बातम्या व इम्पॅक्ट…

स्वातंत्र्याच्या 74 वर्षानंतरही हटवांजरी (पोड) येथे रस्ता नाही

वणी बहुगुणी इम्पॅक्ट: अखेर शिवनाळा वासियांना मिळाला डांबरी रस्ता

हे देखील वाचा:

ट्रु केअर पॉलिक्लिनिक येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर

एका वाघानंतर आता तब्बल 4 वाघांच्या दर्शनाने परिसरात दहशत

जंगलात शेळकीची कीटकनाथक प्राशन करून आत्महत्या

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.