”पुकारता चला हू मैं”ऑनलाईन संगीत रजनी रंगली
कलोतीनगर, अमरावती येथील सिंफनी स्टुडिओचे आयोजन
बहुगुणी डेस्क, अमरावतीः विविध निवडक गीतांची ”पुकारता चला हू मैं ”ऑनलाईन संगीत रजनी रंगली. सिंफनी गृप ऑफ म्युझिक कल्चरल अॅण्ड वेलफेअर ट्रस्ट अमरावती आणि सिंफनी स्टुडिओने या ऑनलाईन मैफलीचं आयोजन केलं होतं. हा कार्यक्रम सिंफनी ट्यून्स या युट्यूब चॅनलवर प्रसारित झाला. सोबतच सिंफनी ग्रुपच्या फेसबूक पेजवरूनदेखील हजारों रसिकांनी या ऑनलाईन मैफलीचा आस्वाद घेतला.
या मैफलीचा आरंभ पल्लवी राऊत यांनी गायलेल्या निला आसमान या गीताने झाला. त्यानंतर डॉ. गुणवंत डहाणे यांनी पुकारता चला हूं मैं हे कार्यक्रमाचं शीर्षकगीत गायलं. दो नैना इक कहाणी हे गीत डॉ. नैना दापूरकर यांनी प्रस्तुत केलं.
संसार है ईक नदिया हे गीत संजय व्यवहारे यांनी गायलं. का करू सजनी या गुरुमूर्ती चावली यांनी गायलेल्या गीतांने मैफलीत वेगळा रंग चढला. डॉ. नयना दापूरकर यांनी गायलेल्या ना जाने क्यू या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
संगीत संयोजन सुनित बोरकर यांनी केलं. पियानोची साथ सचिन गुडे यांनी तर तबल्याची साथ विशाल पांडे यांनी केली. इंडिया वॉइस फेस्ट मध्ये दोन कॅटेगरीमध्ये दोन राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त, आणि रेक्स कर्मवीर ग्लोबल फैलोशिप आणि कर्मवीर चक्र अवार्डने सम्मानित तसेच जगविख्यात सुप्रसिद्ध अनाउंसर हरीश भिमानी यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त नासीर खान यांनी या मैफलीचं दर्जेदार निवेदन केलं.
याचं दर्जेदार चित्रिकरण अमिन गुडे यांनी केलं आहे. तंत्र दिग्ददर्शन भूषण बारबुद्धे यांनी केलं. जुना बायपास रोडवरील कलोतीनगरातील सिंफनी स्टुडिओत या कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग झालं. नव्या कलावंतांनासुद्धा विविध उपक्रमांत संधी देण्याचा प्रयत्न करू असं सिंफनीचे अध्यक्ष सचिन गुडे यांनी कळविले आहे.
कार्यक्रम खालील लिंकवर नि:शुल्क बघता येईल
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा