जब्बार चीनी, वणी: मंगळवार दिनांक 1३ एप्रिल रोजी तालुक्यात शासकीय लॅबनुसार कोरोनाचे 27 रुग्ण आढळून आलेत. यात वणी शहरातील 09, ग्रामीण 14, वरोरा तालुका 4 आणि मारेगाव तालुक्यातील 1 रुग्ण आहे. आज मोहदा येथील कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला.
मंगळवारी आलेल्या रुग्णांमुळे तालुक्यातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 307 झाली आहे. मृतकांची संख्या आता 29 झाली आहे.
शहरामध्ये जनता हायस्कूल परिसर, शास्त्रीनगर, विठ्ठलवाडी, पटवारी कॉलनी, तेली फैल, देशमुखवाडी, बॅंक कॉलनी, वॉटर सप्लाय परिसर, ढुमेनगर येथे प्रत्येकी 1 असे रुग्ण आढळलेत. नांदेपेरा 2, शिरपूर 2़ राजूर कॉलरी 2, पुरड(पुनवट) 1, चिखलगाव 2, छोरिया ले आऊट, गणेशपूर 3, भालर टाऊनशिप 1 असे रुग्ण आढळलेत.
मंगळवारी यवतमाळ येथून 89 अहवाल प्राप्त झाले. यात 13 जण पॉजिटिव्ह तर 76 निगेटिव्ह आलेत. तर आज 48 संशयीतांची रॅपिट ऍन्टीजन टेस्ट करण्यात आली. यात 14 व्यक्ती पॉजिटिव्ह आलेत. अद्याप यवतमाळहून 664 संशयीतांचे रिपोर्ट येणे बाकी आहे. आज 43 कोरोनामुक्त व्यक्तींना सुटी देण्यात आली.
सध्या तालुक्यात 307 ऍक्टिव्ह रुग्ण (शासकीय लॅबच्या आकड्यानुसार) आहेत. यातील 66 रुग्ण कोविड केअर सेंटरला उपचार घेत आहेत. तर 188 रुग्ण होम आयसोलेट आहेत. 53 रुग्णांवर यवतमाळ व इतर ठिकाणी उपचार सुरू आहे.
तालुक्यात कोरोनाचे एकूण 1913 रुग्ण आढळून आलेत. यातील 1577 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आजपर्यंत 29 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा