शिवसुत मेडिकलमध्ये चोरी

अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

0

विवेक तोटेवार ,वणी: जत्रा रोडवर असलेल्या शिवसुत मेडिकल मध्ये सोमवार 3 मेच्या रात्री अज्ञात चोरट्याने 5000 रूपये चोरून नेल्याचे घटना घडली. मेडिकलच्या मालकाच्या लक्षात येताच त्यांनी वणी पोलिसात तक्रार दिली .

सविस्तर वृत्त असे की, जत्रा रोडवरील जामा मशिदीजवळ शिवेंद्र ब्राह्मणकर यांचे शिवसुत मेडिकल स्टोअर्स आहे. सोमवार सायंकाळी ते नेहमीप्रमाणे 8 वाजता मेडिकल बंद करून घरी गेले. सकाळी 9 वाजता त्यांना मेडिकलच्या शटरचे कुलूप तुटून दिसले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

त्यांना शंका आल्याने त्यांनी मेडिकल उघडून बघितले असता गल्ला उघडा दिसला. बघितले असता त्यातून 5000 हजार रुपये चोरी गेल्याचे समजले. त्यांनी त्वरित वणी पोलिसात याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम 461, 380 भादंविनुसार गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.

हेदेखील वाचा

हेदेखील वाचा

हेदेखील वाचा

वणीमध्ये आलाये पाण्याच्या टाकीचा डॉक्टर

Leave A Reply

Your email address will not be published.