जब्बार चीनी, वणी: वणी शहरासाठी आज दिलासा देणारी बातमी आहे. आज शनिवार दिनांक 1 मे रोजी वणी शहरात एकही रुग्ण आढळला नाही. वणी तालुक्यात कोरोना रुग्णांपेक्षा कोरोनावर मात करणा-यांची संख्या जवळपास सारखीच आहे.
आज तालुक्यात 77 रुग्ण आढळलेत. तर 75 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज आलेल्या रुग्णांमध्ये शहरात एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही. तर ग्रामीण भागात 36 पॉझिटिव्ह आढळून आलेत. 41 रुग्ण इतर ठिकाणांचे आहे. विशेष म्हणजे आज आरोग्य विभागाने तब्बल 335 संशयीतांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले आहे. अधिकाधिक व्यक्तींच्या टेस्ट होणे ही एक दिलासादायक बाब आहे.
दरम्यान आज यवतमाळ येथे उपचारादरम्यान 7 रुग्णांचा मृत्यू झाला. शासकीय महाविद्यालय येथे वणी येथील 69 वर्षीय पुरुष व 55 वर्षीय महिला व तालुक्यातील 52 वर्षीय पुरुष, खासगी रुग्णालयात एक 51 वर्षीय पुरुष, तर डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये 45, 60, 63 वर्षीय पुरुषांचा मृत्यू झाला.
ग्रामीण भागात आलेल्या 36 रुग्णांपैकी सुंदरनगर 5, निलजई 4, तरोडा 3, उकणी 3, शिरपूर 3, लालगुडा 2, कायर 2, राजूर इजारा 2, तर नायगाव बु,, बोरगाव, पुनवट, भालर, शेलू, मंदर, गणेशपूर, मोहदा, निंबाळा, पुनवट, भांदेवाडा, मजरा येथील प्रत्येकी 1 रुग्ण आज पॉझिटिव्ह आला आहे.
आज यवतमाळ येथून 401अहवाल प्राप्त झालेत. यात 62 व्यक्ती पॉझिटिव्ह आलेत. याशिवाय आज 75 संशयीतांची रॅपिट ऍन्टीजन टेस्ट करण्यात आली. यात 15 व्यक्ती पॉजिटिव्ह आलेत. आज आलेल्या रुग्णांवरून 335 संशयीतांचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले नाही. अद्याप यवतमाळहून 1783 संशयीतांचे रिपोर्ट येणे बाकी आहे.
सध्या तालुक्यात 562 ऍक्टिव्ह रुग्ण (शासकीय लॅबच्या आकड्यानुसार) आहेत. यातील 34 रुग्ण कोविड केअर सेंटरला उपचार घेत आहेत. तर 497 रुग्ण होम आयसोलेट आहेत. 31 रुग्णांवर यवळमाळ व इतर ठिकाणी उपचार सुरू आहे. तालुक्यात कोरोनाचे एकूण 3187 रुग्ण आढळून आलेत. यातील 2571 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत 54 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (यात बाहेरगावी उपचार सुरू असताना मृत झालेल्या रुग्णांचा समावेश नाही.)
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा