काटोल आईएमए द्वारा विविध उपक्रम

0

सुनील इंदुवामन ठाकरे, काटोल: नॅशनल आईएमए निर्देशित ” ज़ीरो टॉलरन्स फॉर वायलेंस अगेंस्ट हेल्थ प्रोफेशनल्स अँड क्लिनिकल एसटैबलिशमेंट्‍स” या अंतर्गत काटोल आईएमए चा “सेफ फ्राटरनिटी वीक” सप्ताह दि. 1 ते 8 जुलै साजरा करण्यात आला.

या अंतर्गत दि. 7 जुलैला काटोल आईएमए आणि डॉ. नागपूरकर हॉस्पिटलच्या सौजन्याने डॉ एन डी काळवीट मेमोरियल IMA हॉल समोर वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी आईएमएच्या सदस्यांनी वृक्षांच्या संगोपनाचासुद्धा निर्धार केला. सोबतच आईएमए आणि डॉ. चिंचे हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यामधे 31 रक्तदात्यांनी सहभाग घेतला.

यासोबतच काटोल नगर परिषदेला संपूर्ण भारतात स्वछता अभियानामधे 5 वा क्रमांक मिळाल्याबद्दल काटोल नगर परिषदेचे अध्यक्ष वैशाली ठाकुर, गटनेते चरणसिंहजी ठाकुर तसेच उपाध्यक्ष जितूभाऊ तुपकर व सर्व पदाधिकारी आणि कर्मचारीवृंदाचे अभिनंदन काटोल आईएमएचे अध्यक्ष डॉ संजय टावरी, सचिव डॉ. अमित बंड, उपाध्यक्ष डॉ सुनीता सावरकर, डॉ निखील नागपूरकर व अन्य आईएमए सदस्य यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

या सर्व उपक्रमात आईएमए काटोलचे डॉ प्रेरणा बारोकर, डॉ प्राची नागपूरकर, डॉ करांडे, डॉ चिंचे, डॉ अरविंद गोतमारे, डॉ सचिन घाटे, डॉ अमोल करांगळे, डॉ नरेश राठी, डॉ अंबा‍डकर, डॉ रेवतकर, डॉ भुतडा, डॉ घोड़े, डॉ नाकाडे, डॉ अग्रवाल, डॉ काळवीट व अन्य आईएमए सदस्य यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.